प्रेमापायी कर्जबाजारी झालेल्या युवकावर आली नको ती वेळ…

ठाणे: एका युवकाने मैत्रीणीवर एवढा पैसा खर्च केला की तो कर्जबाजारी झाला. कर्ज फेडण्यासाठी चोर बनलेल्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश म्हाडसे (वय 32, रा. मुरबाड तालुका) असे पोलिसांनी अटक केलेल्या या चोरट्याचे नाव आहे.

गणेशने प्रेयसीवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले होते. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला. आता हे कर्ज फेडायचे कसं याचा विचार करत असतानाच त्याने बाईक चोरी करण्यास सुरुवात केली. ठाणे शहर आणि परिसरात गणेश दुचाकी चोरायचा आणि मुरबाड मधल्या ग्रामीण भागातील नागरिकांना नंबर प्लेट बदलून स्वस्तात विकायचा. यातून त्याचे कर्ज फिटले. मात्र, त्याला पैशांची चटक लागली आणि तो दुचाकी चोर बनला.

ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण,डोंबिवली, भिवंडी, बदलापूर आशा ठीकठिकाणी त्याने दुचाकी चोरून त्या मुरबाडच्या ग्रामीण भागांत विकल्या. कळवा रुग्णालयातील एका दुचाकी चोरीचा तपास करतांना पोलिसाना सीसीटीव्ही मध्ये युवक आला. पोलिसांनी तपास करत अट्टल बाईक चोराला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 15 चोरी केलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची तो विक्री करणारच होता. त्याचा साथीदाराला सुद्धा पोलिसानी अटक केली आहे. चार दिवस ठाणे न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून अधिक तपास कळवा पोलिस करत आहेत.

नंदू ननावरे आत्महत्या प्रकरणानंतर भावाने कापले बोट; खासदारही अडचणीत…

प्रेम विवाह! मित्राने फोन करून दिली पत्नीबाबतची धक्कादायक माहिती अन्…

बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…

प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने मुलीने केली वडिलांना बेदम मारहाण…

प्रेम! पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मारली नदीत उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!