धक्कादायक! पती-पत्नीने एकाच खोलीतून घेतला जगाचा निरोप…
नाशिक : पती-पत्नीने एकाच खोलीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चांदवडच्या परसूल येथे घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीने विष घेऊन तर पतीने घळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊसाहेब बरकले असे पतीचे तर सुनीता बरकले असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे.
या दाम्पत्याला एक मुलगी आहे. भाऊसाहेब बरकले यांची आई तसेच त्यांची मुलगी या दोन्ही एका वेगळ्या खोलीत होत्या. तर हे पती-पत्नी एका खोलीत झोपले होते. सकाळी त्यांनी दार न उघडल्याने ही घटना समोर आली. यानंतर या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे. घरगुती वादातून या दाम्पत्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!
ललित पाटील प्रकरण! नाशिकमध्ये नदीतून मध्यरात्री कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त…
नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…
Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…
हृदयद्रावक! गरोदर महिलेची आत्महत्या; पोटातील बाळही दगावले…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!