अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणारा गजाआड…
मुंबई : अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणाऱ्याला पोलिसांनी दोन दिवसांमध्येच गजाआड केले आहे. अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात 20 जून रोजी चोरी झाली होती. मुंबई पोलिसांनी चोरी करण्याऱ्या दोन आरोपींना अटक केली. माजिद शेख आणि मोहम्मद दलेर बहरीम खान अशी चोरांची नाव असून दोघांना जोगेश्वरी परिसरातून अटक करण्यात आली आहे.
अनुपम खेर यांच्या वीरा देसाई मार्गावर असलेल्या ऑफिसमध्ये दोन चोर शिरले होते. त्यांनी ऑफिस फोडलं आणि चित्रपटांचे निगेटिव्ह चोरी केल्याचे अनुपम खेर यांनी सांगितले. या प्रकरणानंतर अनुपम खेर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी दोन दिवसात चोरांना शोधले असून त्यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अटक करण्यात आलेल्या दोन्ही चोरांनी यापूर्वी अनेक चोऱ्या केल्या आहेत. ज्या दिवशी त्यांनी अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी केली त्याच दिवशी विलेपार्ले परिसरातही चोरी केली. हे दोघेही मुंबईतील विविध भागात रिक्षामध्ये फिरून चोरी करत होते. अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करत असतानाचे या दोन चोरांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. ज्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मदत झाली.’
प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक…
अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…
प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…