Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…

नाशिकः नाशिकरोड परिसरात दुचाकी चारचाकी वाहनांची जाळपोळ, तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नाशिक पोलिसांनी गुंडाची धिंड काढली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नाशिक पोलिसांनी जाळपोळ, तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. शिवाय, त्यांची नाशिकरोड परिसरातून धिंड काढली. नागरिकांकडून पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली गुन्हेगारांची भीती पोलिसांनी दूर करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. सोमवारी आणि मंगळवारी असे सलग दोन दिवस विहितगाव आणि धोंगडे मळा येथील दुचाकी चारचाकी वाहनांची जाळपोळ करून गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली होती.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. नाशिकरोड परिसरातील धोंगडे नगर, राजलक्ष्मी मंगल कार्यालय, विहितगाव, देवळाली गाव भागात गुन्हेगारांची धिंड काढली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!