ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने 6व्या मजल्यावरुन मारली उडी…

ठाणे : ठाणे महापालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने घराच्या इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ,वैद्यकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉक्टर शारमिंग डिंगा (रा. मुंब्रा) या हकीम अजमल खान रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळच्या सुमारास त्यांनी त्यांच्या राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर घटनास्थळावरील नागरिकांनी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डॉ. शारमिंग डिंगा यांच्या मागे तीन मुले असून त्यांचे पती परदेशात नोकरी करतात अशी माहिती समोर आली आहे. मात्र त्यांनी घेतलेल्या या निर्णायामुळे कुटुंबीयांसह सहकारी डॉक्टरांना मोठा धक्का बसला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांकडून या प्रकरणाचा विविध बाजून तपास सुरु आहे. शिवाय, त्यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड तसेच इतर गोष्टींची तपासणी केली जात असल्याचीही माहिती समोर येत आहे. डॉ. शारमिंग डिंगा याचे पार्थिव शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. पण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूबाबत अधिक माहिती पोलिसांनी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पुणे! नामांकित डॉक्टरने घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

हृदयद्रावक! महिला डॉक्टरनं घेतला ओव्हरडोस अन् इंजेक्शन; कारण आलं समोर…

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणातील PSI बदने याला जामीन; पाहा 3 अटी…

सातारा! महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण…

धक्कादायक! CMOचा महिला डॉक्टरला शारिरीक संबंधासाठी कॉल; तयार हो…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!