राजधानी हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर 2 तास सामूहिक अत्याचार; अंगावर काटा…

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एका खासगी बसमध्ये महिलेसोबत सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना १२ मे रोजी घडली आहे. महिलेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. या प्रकरणी बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास करत आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिला तीन मुले आहेत. तक्रार मिळाल्यानंतर महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. खासगी बस ताब्यात घेतली आहे, ज्यामध्ये महिलेसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडल्याचा आरोप आहे. तपासात मदत होईल असे पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस आता बसची फॉरेन्सिक तपासणी करत आहेत. शिवाय, बसमधील आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे. घटनेच्या वेळी बस नेमकी कुठे-कुठे गेली होती, याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

महिलेचा जबाब, वैद्यकीय अहवाल आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. घटनेच्या वेळी बसमध्ये आणखी कोण उपस्थित होते, याचाही शोध तपास पथक घेत आहे. या घटनेतील बस ‘रॉयल ट्रॅव्हल्स अँड कार्गो’ (Royal Travels & Cargo) या कंपनीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आम आदमी पक्षाचे (AAP) नेते सौरभ भारद्वाज यांनी ‘X’ वर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अतिशय लाजीरवाणी घटना आहे. ‘निर्भया’ प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. एका ३० वर्षीय महिलेला रात्री वेळ विचारण्याच्या बहाण्याने बसमध्ये ओढण्यात आले. त्यानंतर चालत्या बसमध्ये सुमारे २ तास अनेक जणांनी तिच्यावर बलात्कार केला. दिल्लीच्या राणी बाग परिसरात ७ किलोमीटरपर्यंत ही बस फिरत होती.”

महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार…

सांगली! सामूहिक बलात्कार करत मुलीचे कपडेही पळवले; विवस्त्र अवस्थेत चालत राहिली…

धक्कादायक! भावाला मारलं अन् गर्भवती वहिनीवर केला बलात्कार…

वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्राच्या घरी घेऊन गेला अन् केला सामूहिक बलात्कार…

धक्कादायक! युवकाने होणाऱ्या पत्नीवर केला जबरदस्तीने बलात्कार अन् खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!