मुळशी पॅटर्न चित्रपटातील ‘पिट्या भाई’ची पोस्ट चर्चेत…

पुणेः पुणे शहरात ललित पाटील प्रकरण चर्चेत असताना आता अमली पदार्थाचे नवीन प्रकरण समोर आले आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटातील ‘पिट्या भाई’ अर्थात अभिनेता रमेश परदेशीची पोस्ट आता चर्चेत आली आहे.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात रमेश परदेशीने पिट्या भाईची भूमिका साकारली होती. रमेश परदेशीने काही महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल करत पुण्यातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचा आरोप केला होता. आता, पुण्यात पोर्शे कार प्रकरण आणि त्यानंतर आता सुरू असलेल्या अमली पदार्थ सेवनाच्या मुद्यावरून रमेश परदेशीची पोस्ट चर्चेत आली आहे. रमेश परदेशीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, व्यसन,ड्रग्स आधी शहराच्या वेशीवर होते मग टेकड्या आणि आता मध्यवस्तीत आलय. घरापर्यंत किंवा घरात यायची वाट पाहणार का? आपण पुणेकर म्हणुन काही करणार की नाही. मी तर करणार तुम्ही? असा प्रश्न पिट्याभाईने पुणेकरांना विचारला आहे.

रमेश परदेशीने आणखी एक पोस्ट केली आहे. रमेश परदेशीने मॉलच्या बाथरुममध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज सेवनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने म्हटले की, आधी ललित पाटील,आज फर्ग्युसन रस्त्यावर ड्रग्स पार्टी आणि त्याच दिवशी एका मॉलच्या बाथरूम मध्ये ह्या तरुणींचे ड्रग्स सेवन. हेच अशा प्रकारच वास्तव मी काही महिन्यापूर्वी दाखवलं (अपवाद चेहरे ब्लर करायचा) त्यांनी तर जे काही व्यसन केल ते तर सार्वजनिक जागेत ते पण सर्वासमोर आणि ते करताना त्यांना काही फरक पडला नाही. आणि आता ह्या बाथरूम मध्ये हे करतायत बिनधास्त आणि त्यांच सार्वजनिक आयुष्य कस धोक्यात आणले ही तक्रार करून माझे माझ्या कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य घालावले असे रमेश परदेशीने म्हटले.

आपल्या पोस्टमध्ये त्याने पुढे म्हटले की, आपले आपल्या शहराकडे, आपल्या आणि आजुबाजूला असणार्‍या मुलांमुलीकडे लक्ष आहे का? आपण लक्ष देणार आहोत का? की फक्त प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यावर अवलंबून न राहता एक पालक नागरिक म्हणून पुढची पिढी बरबाद होऊ नये म्हणून काही करणार आहोत का? असा सवाल करताना आणि करणार असाल तर डोळे,कान उघडे करून फिरा असे आवाहनही त्याने केले. सगळे जण मिळून छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोन्याच्या नांगरान नांगरलेल्या पावित्र पुण्यभूमीला जपू अशी सादही रमेशने आपल्या पोस्टमध्ये घातली आहे.

पुण्यात कायद्याचं राज्य राहिलंय का? विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याला आता ड्रग्जमाफियांनी ताब्यात घेतलंय का? पुण्याला ड्रग्जच्या नशेबाजांचा विळखा पडलाय का? आणि पुण्यात कायदा-सुव्यवस्था नावाची गोष्ट औषधाला तरी उरलीय का? असे संतप्त सवाल आता पुणेकर विचारू लागले आहेत.

पिट्याभाईला टेकडीवरील मुलींचे फेसबुक लाईव्ह भोवणार?

पुणे: ‘मुळशी पॅटर्न’मधील पिट्या भाईंनी युवतींचा धक्कादायक Video आणला समोर…

Video: पुणे पब ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई…

पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई; दोन पोलिस बडतर्फ…

Video: पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक…

पुणे जिल्ह्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; कंपनी सील; ड्रग्ज जप्त…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अगरवाल याला जामीन; पण…

पुणे शहरात कोयता गँगने धुमाकूळ घालत केली वाहनांची तोडफोड…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!