प्रेमी युगुलाने आत्महत्येसाठी निवडली हॉटेलमधील रूम नंबर 305ची खोली…

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश सुरेश राऊत आणि दिपाली अशोक मरकड (दोघेही रा. बिडकीन) असे प्रेमीयुगूलाची नावे आहेत. शहरातील पंचवटी हॉटेलमध्ये दोघे थांबले होते. रूम नंबर 305 मध्ये दोघांनी गळफास घेऊन आयुष्य संपवले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

दरम्यान, पोलिसांनी रुमची पूर्ण झडती घेतली. मात्र, सुसाईड नोट सापडली नाही. वेदांतनगर पोलिस पुढील चौकशी करत आहेत.

‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…

मला माझीच लाज वाटते; गुड बाय साकिब; माझं तुझ्यावर प्रेम आहे…

बस किस्मतने साथ नही दिया साहब, वरना दिल तो हमारा भी पागल था…

मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!