
गौरी पालवे यांच्या वडिलांच्या आरोपामुळे पंकजा मुंडेंच्या पीएच्या वाढल्या अडचणी…
बीड : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याच्यावर गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलीची हत्या झाली, त्यानंतर ती आत्महत्या दाखवण्यात आल्याचा आरोप गौरी पालवे यांच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणात जे काही करायचं ते करा, पण आम्हाला न्याय द्या अशी मागणी गौरी यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
पंकजा मुंडे यांचा खासगी पीए असलेल्या अनंत गर्जे याच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे हिचा 23 नोव्हेंबर रोजी मुंबईतील राहत्या घरात मृतदेह आढळला. गौरीने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे. तर गौरीची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. गौरी पालवे यांचे वडील म्हणाले, ‘या प्रकरणात गुन्हेगारांची नार्कोटेस्ट, ब्रेन मॅपिंग जे काही करायचं ते करा. माझ्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी न करता आत्महत्या कसे ठरवता? अनंत गर्जे याच्यासह त्याचा भाऊ आणि त्याची बहीण यांची चौकशी व्हावी. अनंत गर्जे त्याचे स्टेटमेंट वारंवार बदलत आहे. त्यामुळे त्याची चौकशी करावी. या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करा आणि त्यांचा सीडीआर आम्हाला द्या. दोन सहकाऱ्यांच्या मदतीने गौरीला मारण्यात आले आहे. गौरीच्या डोक्यावर आणि छातीवर मारल्याच्या खुना आहेत. मग स्पॉट पंचनामा करून ही आत्महत्या कशी काय ठरवली?’
गौरीला मारहाण करण्यात आली, त्यामध्ये तिचा जीव गेला. त्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आल्याचा दावा गौरीच्या वडिलांनी केला आहे. अनंतने आदल्या दिवशी फोन करून गौरीने आत्महत्या केल्याचे सांगितले, तिचे प्रेत समोर असल्याचे सांगितले. त्यामुळे अनंत गर्जे हा वारंवार त्याचे स्टेटमेंट बदलतोय असा दावा गौरी यांच्या वडिलांनी केला आहे.
गौरी पालवे यांच्या वडीलांनी वरळी पोलिसांना पत्र लिहले आहे. गौरीच्या हत्याप्रकरणात फक्त अनंत गर्जेला अटक झाली, या प्रकरणात दीर अजय गर्जे आणि नणंद शितल आंधळे मोकाट फिरत आहेत. अनंत आणि गौरी राहत होते त्या बिल्डींगचा CCTV फुटेज देण्यात यावा.
दरम्यान, याचवर्षी फेब्रुवारीमध्ये अनंत गर्जे आणि गौरीचं लग्न झाले होते. मात्र अनंतचे बाहेर अनैतिक संबंध असल्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे, आणि मारहाण केली जायची असे आरोप पालवे कुटुंबीयांनी केले आहेत.
अनंत गर्जे याच्या प्रेमसंबंधांविषयी माहिती होतं; घरासमोरच अंत्यसंस्कार…
गौरी पालवे-गर्जे यांना सापडलेल्या कागदपत्रातून धक्कादायक खुलासा…
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याला अटक; मृत्यूपूर्वीच्या कॉलवरुन वाढला संभ्रम…
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

