हृदयद्रावक! पत्नीसोबत सेल्फी अन् घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये म्हटले…
लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीसोबत सेल्फी घेऊन नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ बब्बर आणि पत्नी मोना बब्बर अशी आत्महत्या केलेल्या दांपत्याची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेल्या ज्वेलर शॉपच्या मालकाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सहारनपूरमध्ये साई ज्वेलर्सचे सौरभ बब्बर कर्जबाजारी झाले होते, त्यामुळे त्यांनी पत्नी मोना सह हरिद्वारच्या गंगा नदीमध्ये उडी घेतली. गंगा नदीमध्ये उडी मारण्यापूर्वी सौरभ यांनी पत्नीसोबत सेल्फी घेतला आणि तो मित्रांना व्हॉट्सऍपवरही पाठवला. यानंतर गंगेमध्ये उडी मारून जगाचा निरोप घेतला. सौरभ यांच्या मृतदेहासोबतच एक चिठ्ठीही मिळाली आहे, ज्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.
दरम्यान, सौरभ बब्बर गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. सहारनपूरमध्ये ते गोल्ड कमिटी नावाने ओळखले जात होते. सौरभ बब्बर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये 10 ऑगस्ट ही तारीख लिहिण्यात आली आहे. तर सेल्फीमध्ये कॅमेरा टाईम 10 ऑगस्ट 2024 आणि 1 वाजून 23 मिनिटं दाखवत आहे. आम्ही आमच्या कर्जदारांना अंदाधुंद व्याज दिले आहे आणि आता आम्ही आणखी पैसे देऊ शकत नाही. आम्ही दोन्ही मुलांना आजीकडे ठेवून जात आहे, आमचा कुणावरही विश्वास नाही, इस दुनिया को अलविदा, असे सौरभ यांनी चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.
यशश्री शिंदे हिचा गहाळ मोबाईल सापडला; खळबळजनक खुलासे…
हृदयद्रावक! अहमदनगर जिल्ह्यातील नवदाम्पत्याने संपवलं आयुष्य…
डॉक्टर बलात्कार आणि हत्या! पोलिसांच्या तीक्ष्ण नजर अन् आरोपीचे फुटलं बिंग…
हृदयद्रावक! कुत्रा चिमुकलीच्या अंगावर आदळल्याने मृत्यू तर कुत्रा…
हृदयद्रावक! पिंपरीत अंगावर गेट पडल्याने चिमुकलीचा मृत्यू…
हृदयद्रावक! बापलेकाने एकमेकांना घट्ट मिठी मारून रेल्वेखाली केली आत्महत्या…