तू माझी झाली नाही तर, मी तूला कोणाचीच होऊ देणार नाही…
पुणे: पुणे शहरात युवतीला एकतर्फी प्रेमातून ‘तू माझी झाली नाही तर, मी तूला कोणाचीच होऊ देणार नाही’ असे म्हणत ब्लेडने वार करण्याची धमकी दिली आहे. धायरी परिसरात ही घटना घडली असून, या प्रकरणी एकावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक प्रकाश गायकवाड याच्यावर विनयभंगासह धमकी दिल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…
पुणे : अनैतिक संबंधातून राहिलेला गर्भ पात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना महिलेच्या दोन लहान मुलांनी आरडा ओरड केल्यामुळे त्यांना पाण्यात जिवंत फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी आरोपीला आंबी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महिलेची हत्या ६ जुलै ते ९ […]
अधिक वाचा...पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरात रात्र गस्त पथकातील पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर भरधाव कार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वसरंक्षणार्थ पोलिस अधिकाऱ्याने एक राउंड फायर केला. कात्रजच्या वंडरसिटी परिसरात शनिवारी (दि.२१) मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक रतिकांत चंद्रशा कोळी (वय ३०, रा. […]
अधिक वाचा...Hit and Run! पिंपरी-चिंचवडमध्ये कारने पादचारी महिलेला उडवलं…
पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरात हिट अँड रनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार चालकाकडून रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या महिलेच्या अंगावर घातल्यानंतर कारचालक पसार झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हिट ऍण्ड रनचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने यात महिला थोडक्यात बचावली आहे, मात्र त्या जखमी झाल्या आहे. पिंपरी गावात रस्त्याच्या बाजूने चाललेल्या महिलेला कारने समोरून येत ठोकरले. त्यानंतर […]
अधिक वाचा...पुणे शहरात पीएमटी बसचालकाला पोलिसाने केली मारहाण; कारण…
पुणे : पुणे शहरात पीएमटी बसचालकाला पोलिसाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिस दुचाकीवरून जात असताना पीएमटी चालकाने दुचाकीला खेटून बस चालवल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि मारहाणीची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिस शिपाई आणि पीएमटीचा ड्रायव्हर यांच्यात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यावेळी, वाहनचालक हा चालकाच्या सीटवर बसलेला दिसून येतो, तर […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी चोरी व गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना केले परत…
पुणे (संदिप कद्रे): खडक पोलिस स्टेशन कडून नागरिकांचे चोरी व गहाळ झालेले ४,००००० रुपये किंमतीचे एकुण २५ मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत. यावेळी नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ- ०१ मधिल नागरिकांचे सन २०२३ ते २०२४ मध्ये चोरीस गेलेले / गहाळ झालेले मोबाईल संदर्भात खडक पोलिस स्टेशन येथे तक्रारी प्राप्त झालेल्या […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील कॉलेजमधील पाच विद्यार्थ्यांनी मारली दांडी अन् बेतले जीवावर…
पुणे : पुणे जिल्ह्यातील एम.एस कॉलेजमधील 5 विद्यार्थ्यांनी कॉलेजला सुट्टी दांडी मारून मावळातील कासारसाई धरणावर जाण्याचा बेत आखला. एकाचा धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सारंग रामचंद्र डोळसे (वय १७, रा. थेरगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! थेरगाव येथील एम एस ज्युनियर कॉलेजचे […]
अधिक वाचा...पुणे शहरातील युनिट ६ला फरार आरोपीला गजाआड करण्यात यश…
पुणे (संदिप कद्रे): मोक्यातील सहा महिन्यांपासून पाहिजे असलेला आरोपीला गजाआड करण्यात गुन्हे शाखा युनिट ६ ला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलिस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत पाहिजे व फरार आरोपींचा 18/07/2024 रोजी शोध व गुन्हेगार चेकिंग गस्त […]
अधिक वाचा...IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केली अटक
पुणे: राज्यभरात चर्चेत असलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील महाड मधील हॉटेलमधून अटक केली आहे. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. […]
अधिक वाचा...बारामती हादरली! स्वच्छतागृहात आढळलं स्त्री जातीचं मृत अर्भक…
पुणे : बारामतीच्या माळेगावातील कृषी विज्ञान केंद्राच्या स्वच्छतागृहामध्ये नवजात स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहामध्ये नवजात स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्यानंतर माळेगाव पोलिस ठाण्यात कृषी विज्ञान केंद्राचे सहाय्यक व्यवस्थापक कृष्णा तावरे यांनी फिर्याद दिली आहे. कृषी विज्ञान […]
अधिक वाचा...
