IT कर्मचाऱ्याने महिला सहकाऱ्यांचा चोरून बनवला व्हिडिओ; मोबाईलमध्ये क्लीप…

बेंगळुरू (कर्नाटक): बेंगळुरू येथील IT इन्फोसिस कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला ऑफिसच्या वॉशरूममध्ये एका महिला सहकाऱ्याचा गुप्तपणे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. स्वप्नील नागेश माळी (वय २८, रा. आंध्र प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आरोपी शौचालयातील कमोडवर चढला आणि त्याच्या मोबाईलने व्हिडिओ रेकॉर्ड केला. रेकॉर्डिंग दरम्यान सावली समोरच्या दारावर दिसली, ज्यामुळे महिलेला संशय आला. यानंतर आरोपीचे कारनामे पुढे आले. दक्षिण पूर्व विभागाच्या डीसीपी सारा फातिमा म्हणाल्या की, आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे आणि तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. आरोपीला अटक केली, तो तांत्रिक विश्लेषक म्हणून काम करत होता. आरोपीच्या मोबाईलमधून व्हिडिओ जप्त केला. आरोपीच्या फोनमध्ये 50 हून अधिक महिलांचे व्हिडिओ आढळले. तरीही, कंपनी व्यवस्थापनाने आरोपीला फक्त माफीनामा लिहिण्यास भाग पाडले. त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही.’

पीडित महिलेच्या पतीला ही घटना कळताच त्याने इन्फोसिसवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मंगळवारी त्याने इलेक्ट्रॉनिक सिटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारे बुधवारी आरोपीला अटक करण्यात आली. इन्फोसिसने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला या घटनेची जाणीव आहे आणि कंपनीपासून वेगळे झालेल्या कर्मचाऱ्याविरुद्ध आवश्यक ती कारवाई केली आहे. आम्ही कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडे त्वरित तक्रार दाखल करून तक्रारदाराला तातडीने पाठिंबा दिला आणि पुढील तपासात सहकार्य करत राहिलो. इन्फोसिस छळमुक्त वातावरण प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. कंपनीच्या आचारसंहितेच्या कोणत्याही उल्लंघनाशी संबंधित प्रत्येक तक्रार आम्ही गांभीर्याने घेतो.’

पुणे! मोबाईल गरम झाला अन् भोंदूबाबाचं भलतंच कांड झालं उघड…

मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आरोपींच्या मोबाईलमध्ये 546 मुलींचे अश्लील फोटो अन् व्हिडिओ…

शिक्षक वर्गातच मोबाईलवर पाहता होता अश्लील व्हिडीओ; विद्यार्थ्याने पाहिलं अन्…

Video: मोबाईल चोराला मिळाले पत्नीचे प्रायव्हेट व्हिडीओ अन् पुढे…

विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार अन् मुख्याध्यापकाची आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!