पुणे शहरातील एकाने पत्नीला Live Location बरोबरच मेसेज केला अन्…

पुणे : पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर घरा बाहेर पडलेल्या पतीने स्वत:चे लाईव्ह लोकेशन आणि आपण जीवन संपवत असल्याचा मेसेज केला आणि नदीत उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये पतीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिरात खळबळ उडाली आहे.

पुणे शहरातील पुण्याच्या धनकवडी भागात राहणारे आणि फरसाण आणि नमकीनचा व्यवसाय करणारे श्रीकांत देशमुख यांचे त्यांच्या पत्नीशी भांडण झाले होते. देशमुख यानंतर घरातून बाहेर पडले आणि ते कार घेऊन निघाले. 75 किमी ड्राईव्ह केल्यानंतर श्रीकांत देशमुख वरंधा घाटात पोहोचले. मुसळधार पाऊस पडत असतानाच त्यांनी वरंधा घाटात गाडी थांबवली आणि मोबाईलवरून पत्नीला लाईव्ह लोकेशन पाठवले. आपण आयुष्य संपवत असल्याचा मेसेजही त्यांनी पत्नीला केला, यानंतर श्रीकांत देशमुख यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

पतीचा धक्कादायक मेसेज पाहून पत्नी घाबरली आणि तिने लगेच जवळच असलेले पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनीही लगेच सूत्र फिरवत श्रीकांत देशमुख यांचे शेवटचे लाईव्ह लोकेशन भोर पोलिसांना पाठवले. भोर पोलिसांनीही लगेच देशमुख यांना शोधण्यासाठी रेस्क्यू टीम तयार केली. पोलिसांची टीम श्रीकांत देशमुख यांनी दिलेल्या लोकेशनवर जाऊन पोहोचली. घटनास्थळी पोहचल्यावर पोलिसांनी शोध घेतला पण त्यांना श्रीकांत देशमुख सापडले नाहीत. 5 किमी पुढे गेल्यानंतर पोलिसांना श्रीकांत देशमुख यांची कार सापडली.

पोलिसांनी दोन तास शोध घेतल्यानंतर नदीमध्ये श्रीकांत देशमुख यांचा मृतदेह सापडला. वरंधा घाटात असलेल्या पुलावरून श्रीकांत देशमुख यांनी नदीमध्ये उडी मारली होती. श्रीकांत देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले, त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाला देण्यात आला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. श्रीकांत देशमुख यांच्या मागे पत्नीसह दोन अल्पवयीन मुली आहेत. पत्नीसोबत कडाक्याचं भांडण झाल्यानंतर श्रीकांत देशमुख घरातून बाहेर पडले आणि त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…

नवविवाहितेने दाजिला शेवटचा मेसेज करून घेतला जगाचा निरोप…

पुणे शहरातील महिला पोलिसाचे निलंबन; धक्कादायक धमकी…

पुण्यातील गुंड गजा मारणे याला रिल्स बनवणं पडलं महागात…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!