पुणे! चेंजिंग रूममध्ये CCTV कॅमेरा; महिलेचा कपडे बदलताना Video काढला अन्…

पुणे: कामशेत परिसरात असलेल्या एका दुकानामध्ये कपडे बदलण्यासाठी गेलेल्या महिलेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी दुकान मालकावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. मुकेश मुथा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडित महिला मुकेश फॅन्सी कॉर्नर या दुकानात खरेदीसाठी गेली होती. यावेळी दुकान मालक मुकेश मुथा याने दुकानाच्या स्टोअर रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे, हे माहिती असतानाही पीडितेस तिथे कपडे बदलण्यासाठी पाठवले. पीडित महिला कपडे बदलत असताना तिचे जाणीवपूर्वक चित्रीकरण करून, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले. इतकेच नव्हे तर या प्रकारानंतर त्याने पीडितेस दमदाटीही केली. याप्रकरणी पीडित महिलेने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७७ आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ आरोपी मुकेश मुथा याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

मिळालेल्या माहितीनुसार, कामशेत येथील ‘मुकेश फॅन्सी कॉर्नर’ या दुकानात १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दुकानमालक मुकेश मुथा (रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) याने पीडितेला कपडे बदलण्यासाठी स्टोअररूममध्ये पाठवले. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची माहिती असूनही, आरोपीने जाणीवपूर्वक तिचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण केल्याचा गंभीर आरोप आहे. या कृत्यामुळे पीडितेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने पीडितेला दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, पोलिसांनी आरोपी मुकेश मुथा याला अटक करून वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर केले आहे.

पुणे! युवकाच्या ब्लॅकमेलिंगमुळे युवतीने केली आत्महत्या…

पुणे जिल्ह्यात आईने आवळला मुलीचा गळा अन् मुलासह घेतली विहिरीत उडी…

पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…

पुणे! प्रियकर पतीला मारत असताना पत्नीने मोबाईल सुरू केला अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!