युवतीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने बॉसला लिहिले पत्र…

पुणे : पुण्यात चार्टर्ड अकाउंटंट युवतीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी ती काम करत असलेल्या कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. युवतीवर कामाचा ताण असल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

बिग ४ अकाउंट फर्मच्या EY कंपनीच्या पुण्यातील एका शाखेत एना सेबेस्टियन पिरेयिल (वय २०, रा. केरळ) काम करत होती. एनाच्या मृत्यूनंतर एनाच्या आईने भारतातील कंपनीचे प्रमुख राजीव मेमानी यांना पत्र लिहिले आहे. मुलीने कंपनी जॉइन केल्यानंतर ती नेहमीच कामाच्या तणावाखाली रहायची. एनाने मार्च २०२४ मध्ये कंपनी जॉइन केली होती. तिचा मृत्यू 20 जुलै रोजी झाला.

एनाच्या आईने म्हटले की, ‘पहिलीच नोकरी असल्याने एनाने कामासाठी वाहून घेतले होते. कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती खूप काम करायची. मात्र, याचा परिणाम शारीरिक, मानसिक आणि आरोग्यावर झाला. कंपनीत जॉइन झाल्यानंतर काही काळातच अस्वस्थ, झोप न येणं, तणावासारख्या समस्या सुरू झाल्या. तरीही ती काम करत होती. तिला वाटायचं की खूप कष्ट, सतत काम करत राहणं हाच यश मिळवण्याचा मार्ग आहे. कामाच्या ताणामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. तिचा मॅनेजर क्रिकेट सामन्यावेळी अनेकदा मिटिंग बदलायचा आणि दिवस संपताना काम द्यायचा. यामुळे ताण वाढायचा.’

‘एनाच्या असिस्टंट मॅनेजरने रात्री कॉल केला आणि काम दिले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पूर्ण व्हायला हवे होते. त्यामुळे तिला रिकव्हर करण्यासाठी, विश्रांतीसाठी वेळ नव्हता. जेव्हा तिने मॅनेजरला अडचण सांगितली तेव्हा तिला उत्तर मिळालं की, तू रात्री काम करू शकतेस, आम्हीही हेच करतो. एना खूप थकून घरी यायची. अनेकदा कपडे न बदलताच थेट झोपून जायची. तिच्याकडे रिपोर्टसाठी मेसेजेस यायचे. डेडलाइन पूर्ण करण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करायची. आम्ही तिला नोकरी सोडायला सांगितलं पण तिला शिकायचं होतं, नवा अनुभव घ्यायचा होता. पण दबाव तिच्यासाठी खूपच जास्त ठरला,’ असे एनाच्या आईने म्हटले आहे.

एनाच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. ईमेलमध्ये मृत्यूच्या काही आठवडे आधी तिच्या छातीत दुखत असल्याचे सांगण्यात आले. तिला पुण्यातील रुग्णालयात नेण्यात आले होते. तिचा ईसीजी नॉर्मल होता. कार्डियोलॉजिस्टनी ती पुरेशी झोप घेत नसल्याचे आणि उशिराने जेवत असल्याचे सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Video: पुणे शहरातील युवतीचा रील्ससाठी जीवघेणा स्टंट…

पुणे शहरातील एकाने पत्नीला Live Location बरोबरच मेसेज केला अन्…

पुणे शहरात युवतीने मित्रासोबत मिळून केला आईचा खून; कारण समोर…

पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…

पुणे शहरातील महिला पोलिसाचे निलंबन; धक्कादायक धमकी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!