हृदयद्रावक! मेडिकल कॉलेजला लागलेल्या भीषण आगीत 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…

लखनौ (उत्तर प्रदेश): झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजला शुक्रवारी (ता. १५) रात्री आग लागली. या आगीत एनआयसीयू वॉर्डमध्ये दाखल असलेल्या 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आग मोठी असल्याने आता मृत्यू झालेल्या बालकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शॉर्ट सर्किट आणि नंतर एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मेडिकल कॉलेजमधील निक्कू (न्यू बॉर्न इंटेन्सिव्ह केअर युनिट) वॉर्डमध्ये सुमारे 12 मुलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. वॉर्डात रात्री 11.40 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वॉर्डच्या खिडकीची काच फोडून आत पोहोचून गंभीररीत्या भाजलेल्या 8 मुलांना बाहेर काढले आहे. पण, दुर्देवाने 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. काही बालकांची प्रकृती चिंताजनक आहे.

मेडिकल कॉलेजमधील निक्कू (न्यू बॉर्न इंटेन्सिव्ह केअर युनिट) वॉर्डमध्ये आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. आगीत मृत्युमुखी पडलेल्या नवजात बालकांच्या नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदयद्रावक होता.

दरम्यान, अपघाताची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आयुक्त आणि डीआयजींना अपघाताची चौकशी करून १२ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक आणि आरोग्य प्रधान सचिव झाशीला रवाना झाले आहेत.

गुजरातमध्ये गेम झोनमध्ये भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…

भाविकांच्या बसला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू; अश्रू अनावर…

प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेलेला प्रियकराचा होरपळून मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!