पुण्यातील गुंड गजा मारणे याला रिल्स बनवणं पडलं महागात…

पुणे : पुण्यातील गुंड गजा मारणे याचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या रिल्समुळे गजा मारणे चांगलाच अडचणीत आला असून पुणे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गेल्या चार तासांपासून गजानन मारणे याची गुन्हे शाखेच्या कार्यालयात झाडाझडती घेण्यात आली. गजानन मारणेच्या नावाने GM boys नावाचे इन्स्टा अकाऊंट आहे. या अकाउंटवर गजानन मारणे याचे साथीदार गजानन मारणेचा उल्लेख करताना डॉन, भाई अशा प्रकारे उल्लेख असलेले रील्स टाकत असतात. या रील्सचा परिणाम युवा पिढीवर होऊन ती गुन्हेगारीकडे आकर्षित होत असल्याचे सांगत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी दहीहंडीच्या दिवशी मंत्री चंद्रकांत पाटील यांची गजानन मारणेने भेट घेतल्याचे रील्स असेच व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी गजानन मारणे याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले. गजानन मारणे हा टीपू पठाण नावाच्या साथीदाराच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करतो. युवा पिढीवर या व्हिडिओचा मोठा परिणाम होत असल्याचे पोलीसांचे निरिक्षण आहे. त्यामुळे गजानन मारणेसह टीपू पठाणला देखील गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलवण्यात आले आहे.

दरम्यान, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरातील नामचीन गुंडांची पोलिसांकडून धींडदेखील काढण्यात आली होती. त्यामधे गजानन मारणेचा देखील समावेश होता. त्यानंतर काही दिवस शांत राहिलेला गजानन मारणे सोशल मीडियावर पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे, पोलिसांकडूनही गजा मारणेवर करडी नजर ठेवली जात असून त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरही पोलिसाचे लक्ष आहे.

रांजणगाव देवस्थानमध्ये विश्वस्तांच्या अनुपस्थितीत गुंड गजानन मारणेचा सत्कार…

गँगस्टर शरद मोहोळच्या पत्नीला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या…

पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…

पुणे शहरात ‘आज यास जिवंत सोडायचे नाही’ म्हणणारे सात आरोपी जेरबंद; पाहा नावे…

सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!