सोलापुरात शिकाऊ डॉक्टरची रेल्वेसमोर उडी, शरीराचे झाले दोन तुकडे…

सोलापूर : एका शिकाऊ डॉक्टरने रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन चौधरी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. रेल्वे त्याच्या अंगावरून गेल्यामुळे त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

होडगी येथील रेल्वे रुळावर सचिन चौधरी याने उडी घेऊन रेल्वेसमोर आत्महत्या केली. रेल्वेची जोरदार धडक झाल्यामुळे सचिनच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. शिकाऊ डॉक्टरने अशा प्रकारची आत्महत्या केल्यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. तो वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होता.

सचिन चौधरी हा मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील असून सोलापुरातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालय एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. सचिनचे वडील श्रीमंत चौधरी छत्रपती संभाजीनगर येथे शेती करतात. सचिनने मित्राची दुचाकी घेतली आणि शहरा जवळ असलेल्या होटगी गावा जवळ गेला. धावत्या रेल्वेसमोर त्याने उडी घेऊन जगाचा निरोप घेतला. वळसंग पोलिसांनी पंचनामा करुन दोन तुकडे झालेला सचिनचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…

इंटरशिप करत असलेल्या डॉक्टरने घेतला जगाचा निरोप…

प्राध्यापकाने विमानात केला डॉक्टर युवतीचा विनयभंग…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!