
पुणे शहरात अनंत चतुदर्शीला 17 रस्ते राहणार बंद; चोख बंदोबस्त…
पुणे: अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आज (सोमवार) संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पुणे शहरातील प्रमुख 17 रस्ते बंद केले जाणार आहेत. विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत.
पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी सकाळी साधारण साडेदहाच्या सुमारास सुरुवात होईल. प्रथम मानाचे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडतील. त्यानंतर इतर सार्वजनिक मंडळांच्या गणपतीची मिरवणूक निघेल. मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहील.
पार्किंगची व्यवस्था पुढीलप्रमाणे…
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाद (दुचाकी), शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ (दुचाकी आणि चारचाकी), एच.व्ही.देसाई महाविद्यालय (दुचाकी अन् चारचाकी), हमालवाडा, नारायणपेठ (दुचाकी), गोगटे प्रशाला, नारायण पेठ (दुचाकी), एसएसपीएमएस, शिवाजीनगर (दुचाकी अन् चारचाकी), पीएमपीएल मैदान, पूरम चौक, सारसबाग (दुचाकी), हरजीवन हॉस्पिटल, सारसबाग (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक (दुचाकी), पर्वती ते दांडेकर पूर ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी, चारचाकी), विमलाबाई गरवाले प्रशाला, डेक्कन जिमखाना (दुचारी अन् चारचाकी), संजीवन रुग्णालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी अन् चारचाकी), फर्ग्युसून कॉलेज (दुचाकी अन् चारचाकी), दैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता (दुचाकी, चारचाकी), मराठवाडा कॉलेज (दुचाकी), पेशवे पथ (दुचाकी), काँग्रेस भवन रस्ता, शिवाजीनगर (दुचाकी), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता (दुचाकी अन् चारचाकी), नदीपात्र भिडे पूल ते गाडगीळ पूल (दुचाकी अन् चारचाकी)
पुण्यात चोख पोलिस बंदोबस्त…
गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गांवरून मिरवणूक जाणार आहे. मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर तसेच उपनगरात साडेसहा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
कसा असणार पोलिस बंदोबस्त?
अतिरिक्त पोलिस आयुक्त : 4
पोलिस उपायुक्त : 10
सहायक पोलिस आयुक्त : 25
पोलिस निरीक्षक : 135
पोलिस कर्मचारी : 5709
राज्य राखीव पोलिस दल : एक तुकडी
गृहरक्षक दलाचे जवान : 394
Video: पुणे शहरात गणेशोत्सव काळात चोरांवर राहणार करडी नजर: पोलिस आयुक्त
पुणे शहरातील महिला पोलिसाचे निलंबन; धक्कादायक धमकी…
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…
पुणे शहरात मद्यधुंद चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं…
मुलीच्या नावे चॅटिंग! पुणे शहरात रस्त्यात भर दिवसा पाठलाग करून कोयत्याने हल्ला…

