पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाने घेतला जगाचा निरोप…

पुणे : शिक्रापूर येथे पोलिस भरतीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका युवकाने मित्राच्या खोलीत राहण्यास असताना गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील रणजीत साळुंखे यांच्या खोलीवर पोलिस भरती परीक्षेसाठी सातारा जिल्ह्यातून विरू संजय काळे आणि आदित्य साळेकर हे दोघे युवक आले […]

अधिक वाचा...

पुणे! युवतीला हॉटेल रेटिंगचे सोपे ‘टास्क’ पडले महागात…

पुणे: हिंजवडी परिसरात एका युवतीला हॉटेल रेटिंगचे सोपे ‘टास्क’ देऊन घरबसल्या पैसे कमवण्याचे आमिष सायबर चोरट्यांनी दाखवले. यानंतर तिची ३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी युवतीला (वय २६) ऑगस्ट २०२५ च्या पहिल्या आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅपवर एका अज्ञात नंबरवरून मेसेज आला होता. “तुम्हाला ऑनलाइन जॉब करण्यात रस आहे […]

अधिक वाचा...

पुणे! संक्रांतीच्या दिवशीच ट्रकच्या धडकेत सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू…

पुणे : संक्रांतीनिमित्त साड्या खरेदी करण्यासाठी जात असताना सख्ख्या बहिणींच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोघींचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडीतील बीआरटी मार्गावर तापकीर चौकाकडून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी फाटा येथे बुधवारी (ता. १४) दुपारी सव्वाच्या सुमारास ही घटना घडली. ऐन सणाच्या दिवशी दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ऋतुजा पांडुरंग शिंदे […]

अधिक वाचा...

पुणे! येरवडा कारागृहात पुन्हा रक्तरंजित थरार…

पुणे : पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात अंतर्गत वादातून एका ६५ वर्षीय वृद्ध कैद्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात संबंधित कैदी गंभीर जखमी झाला आहे. देवकरप्पा गराळे (वय ६५) असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या फजल अहमद अब्दुलकयुम अन्सारी या कैद्याने गराळे यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. ही मारहाण इतकी […]

अधिक वाचा...

बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी; तलवारी, कोयते, लोखंडी रॉड अन्…

बारामती: पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या आणि बोकड चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीकडून पोलिसांनी तब्बल 12 लाख 95 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी या टोळीकडून लहान-मोठ्या अशा 32 शेळ्या आणि बोकड जप्त करून चोरी झालेल्या शेतकऱ्यांना वाटप केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वडगाव निंबाळकर […]

अधिक वाचा...

पुणे! मारण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली; बियर अन् सिगारेटची पार्टी केली अन् 4 तास हत्येचा थरार…

पुणे : पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरातील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून चाकूने गळा चिरून दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना तपासादरम्यान समोर आली आहे. अमनसिंग गचंड (वय १७) असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. आरोपींनी त्याला मारण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली आणि बियर अन् सिगारेटची पार्टी केली. अमनसिंग गचंड याच्या हत्येचा थरार तब्बल चार तास सुरू […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील जगदंबा हॉटेलमध्ये भीषण स्फोट; 10 कर्मचारी भाजले…

पुणे : दौंड-पाटस रस्त्यावरील जगदंब हॉटेलमध्ये आज (बुधवार) दुपारच्या सुमारास गॅसचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात हॉटेलमधील 10 कामगार गंभीर भाजले असून सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सहा कामगारांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जगदंब हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी नेहमीप्रमाणे स्वयंपाकाचे काम सुरू होते. याच दरम्यान […]

अधिक वाचा...

पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी मांडलाय अक्षरशः उच्छाद…

पुणे : पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडत आहे. शेअर बाजार, वर्क फ्रॉम होम आणि स्वस्त कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडून पुणेकरांनी अवघ्या काही दिवसांत तब्बल १ कोटी ३० लाख रुपये गमावले आहेत. पुणे शहरातील विविध भागांतून फसवणुकीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. शिवाजीनगर येथील एका ५० वर्षीय महिलेला […]

अधिक वाचा...

पुण्यातील निवडणूकीवर पुणे पोलिसांची करडी नजर; चुक झाल्यास…

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक असून, याकडे पोलिस यंत्रणा गांभीर्याने पाहत आहे. पुणे शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार प्रचारादरम्यान नेमके कोणते उपक्रम […]

अधिक वाचा...

पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…

पुणे : एका अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. अमनसिंग सुरेद्रसिंह गच्चड (वय १७ वर्षे, रा. टिगरेनगर लेन नं १४, पुणे इन्टरनॅशनल स्कूलजवळ, विश्रांतवाडी), असे खून मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रथमेश चिंधू आढळ (वय १९, रा. उत्तमनगर पुणे), […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!