पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…

पुणे : एका अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. अमनसिंग सुरेद्रसिंह गच्चड (वय १७ वर्षे, रा. टिगरेनगर लेन नं १४, पुणे इन्टरनॅशनल स्कूलजवळ, विश्रांतवाडी), असे खून मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रथमेश चिंधू आढळ (वय १९, रा. उत्तमनगर पुणे), नागेश बालाजी धबाले (वय १९, रा. शिवणे, पुणे) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

सोशल मिडीया इन्स्टाग्रामवरती एका मुलीच्या माध्यमातून आरोपींनी मृत मुलाला कात्रज परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर त्याला खेड शिवापूर येथे नेऊन त्याचा दगड व कोयत्याने वार करून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमनसिंग हा २९ डिसेंबर रोजी गाडी घेऊन घरातून गेला; पण तो परत न आल्याने त्याच्या आईने ३१ डिसेंबर रोजी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यानंतर मुलाच्या मोबाइलचा सीडीआर व लोकेशनवरून विश्रांतवाडी पोलिस स्टेशन, तसेच गुन्हे शाखा, युनिट ३ पुणे शहरचे अधिकारी व अंमलदार यांनी दाखल गुन्ह्याचा तपास सुरू केला. मृत अमनसिंग गच्चड याला प्रथमेश चिंधू आढळ, नागेश बालाजी धबाले, दोन विधिसंघर्ष बालक व इतर मित्रांनी उत्तमनगर परिसरात नेले. त्यांच्याशी जुन्या भांडणावरून अमनचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी हे बेळगाव येथील असल्याचे कळल्यावर त्यांनी कर्नाटकात आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून त्याला कात्रज येथे बोलावून घेतले. त्यानंतर खेडशिवापूर परिसरात नेऊन दगड आणि कोयत्याने वार करून त्याच्या खूनाची कबुली दिली. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…

Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…

पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…

पुणे जिल्ह्यातील डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न…

पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!