हृदयद्रावक! तायक्वांदो खेळाडूचे डोकं छाटलं; आईने डोकं हातात घेऊन केला आक्रोश….

लखनौ (उत्तर प्रदेश): जौनपूरमध्ये जमिनीच्या वादातून तलवारीने तरुणाचा गळा चिरला. अनुराग यादव असे मृत युवकाचे नाव असून, तो कुशल तायक्वांदो खेळाडू होता. अनुरागच्या आईला मुलाच्या मृत्यूचा धक्का बसला असून, ती मुलाच्या डोक्याला कवटाळून आक्रोश करत होती. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

जौनपूर जिल्ह्यातल्या गौराबादशाहपूर पोलिस स्टेशन हद्दीतल्या कबीरद्दीनपूर गावात ही घटना घडली आहे. अनुराग यादवच्या कुटुंबाचा शेजाऱ्यांशी जवळपास 40 वर्षांपासून जमिनीचा वाद सुरू होता. बुधवारी (ता. ३०) सकाळी दोन्ही कुटुंबांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर दुसऱ्या कुटुंबातल्या व्यक्तींनी अनुरागवर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनास्थळीच अनुरागच्या शरीराचे दोन तुकडे झाले. त्याचे डोकं शरीरापासून वेगळं होताच खाली रक्ताचा सडा पडला. हे बघून आरोपी पळून गेले. मृत अनुराग हा इंटर कॉलेजचा विद्यार्थी आणि तायक्वांदो खेळाडू होता. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. काही दिवसांपूर्वी अनुरागने चंदौलीत पार पडलेल्या इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदक आणि नोएडातल्या ओपन नॅशनल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

युवकाच्या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच जौनपूरचे डीएम डॉ. दिनेश चंद्र सिंह आणि एसपी डॉ. अजय पाल शर्मा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिले. डीएम डॉ. सिंह यांनी मॅजिस्ट्रियल चौकशीचे आदेश दिले आहेत. जमीन महसूल विभागाचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी या संपूर्ण घटनेची चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहेत. या घटनेनंतर गावात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि पीएसी फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांच्या पथकांनी छापेमारी सुरू केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या…

हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…

हृदयद्रावक! आईचा दुसरा विवाह अन् अनाथाश्रामत ठेवलेल्या चिमुकल्याची आत्महत्या…

हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…

हृदयद्रावक! पत्नीचं निधन अन् चार मुलींसह बापाने संपवलं स्वत:ला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!