पुणे! युवतीला हॉटेल रेटिंगचे सोपे ‘टास्क’ पडले महागात…

पुणे: हिंजवडी परिसरात एका युवतीला हॉटेल रेटिंगचे सोपे ‘टास्क’ देऊन घरबसल्या पैसे कमवण्याचे आमिष सायबर चोरट्यांनी दाखवले. यानंतर तिची ३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

फिर्यादी युवतीला (वय २६) ऑगस्ट २०२५ च्या पहिल्या आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅपवर एका अज्ञात नंबरवरून मेसेज आला होता. “तुम्हाला ऑनलाइन जॉब करण्यात रस आहे का?” अशी विचारणा करून तिला एका मेसेजिंग ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. सुरुवातीला तिला काही प्रसिद्ध हॉटेल्सना ऑनलाइन रेटिंग देण्याचे साधे टास्क देण्यात आले. विश्वास संपादन करण्यासाठी चोरट्यांनी सुरुवातीच्या काही टास्कनंतर युवतीच्या खात्यावर छोटी रक्कम जमा केली.

Police-Book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

चोरट्यांनी विश्वास बसल्यावर तिला ‘प्रीपेड टास्क’ आणि जास्त परतावा मिळवून देणाऱ्या योजनांचे आमिष दाखवले. याला बळी पडून युवतीने वेगवेगळ्या टप्प्यांवर एकूण ३ लाख ७५ हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यांवर जमा केले. मात्र, जेव्हा तिने स्वतःचे पैसे आणि कमिशन परत मागितले, तेव्हा चोरट्यांनी अधिक पैशांची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात मेसेजिंग ग्रुपमधील व्यक्ती आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. “अशा प्रकारे हॉटेल रेटिंग, यूट्यूब लाईक किंवा गुंतवणुकीचे टास्क देऊन पैसे देणाऱ्या मेसेजला बळी पडू नका. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ऑनलाइन पैसे पाठवू नका,” असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी मांडलाय अक्षरशः उच्छाद…

Cyber Crime! पुणे सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीचे नेटवर्क केले उद्ध्वस्त…

पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!

सायबर चोरट्यांकडून झालेल्या छळाला कंटाळून निवृत्त अधिकाऱ्याची पत्नीसह आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!