पुणे! येरवडा कारागृहात पुन्हा रक्तरंजित थरार…

पुणे : पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात अंतर्गत वादातून एका ६५ वर्षीय वृद्ध कैद्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात संबंधित कैदी गंभीर जखमी झाला आहे. देवकरप्पा गराळे (वय ६५) असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे.

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या फजल अहमद अब्दुलकयुम अन्सारी या कैद्याने गराळे यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती की, गराळे यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Police-Book

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

याप्रकरणी कारागृह हवालदार प्रकाश भोसले यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी कैदी फजल अन्सारी याच्यावर गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सी. बी. बेरड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, येरवडा कारागृहात गेल्या काही दिवसांपासून हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका कैद्याचा फरशीने ठेचून खून करण्यात आला होता. ती घटना ताजी असतानाच आता पुन्हा एका वृद्धाला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Video: Ex IPS रविंद्रनाथ पाटील यांनी येरवडा कारागृहातील दिली धक्कादायक माहिती…

येरवडा कारागृहात कैद्याचा निर्घृण खून; कसा केला पाहा…

येरवडा कारागृहातून कुख्यात गुंडाने ठोकली धूम…

येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…

Video: डॉ. अजय तावरे हाच किडनी रॅकेटचा सूत्रधार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!