पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाने घेतला जगाचा निरोप…

पुणे : शिक्रापूर येथे पोलिस भरतीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका युवकाने मित्राच्या खोलीत राहण्यास असताना गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील रणजीत साळुंखे यांच्या खोलीवर पोलिस भरती परीक्षेसाठी सातारा जिल्ह्यातून विरू संजय काळे आणि आदित्य साळेकर हे दोघे युवक आले होते. हे युवक गेल्या दोन दिवसांपासून त्या खोलीत वास्तव्यास होते. सायंकाळच्या सुमारास विरू काळे हा खोलीत एकटाच असताना त्याने घरातील दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून विरू संजय काळे (वय 22, रा. सातारा) याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Police-Book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

या घटनेची माहिती मृत युवकाचे वडील विजय रामचंद्र काळे (वय 51) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस भरती परीक्षेचा मानसिक ताण किंवा इतर कोणते कारण या आत्महत्येमागे आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; घ्या अधिक माहिती जाणून…

पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निघाली 322 पदांची भरती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख…

मोठी बातमी! पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही मिळणार संधी…

पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकाचं प्रेमप्रकरण अन् बिंग फुटेल म्हणून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!