पुणे शहरातील वाहतुकीत बदल, पाहा पर्यायी मार्ग…
पुणेः पुणे शहरात मेट्राचे दोन मार्ग सुरु झाल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पण, इतर ठिकाणी मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. मेट्रो प्रकल्पाच्या या कामांमुळे पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामुळे आता पुणेकरांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहरातील मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांकडून वाहतुकीत मोठा बदल […]
अधिक वाचा...पुणे कार अपघातानंतर पब आणि बारवर पोलिसांच्या धाडी; युवक-युवतींची धांदल…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात धनिकपुत्राने महागडी पोर्शे कार वेगात चालवून दोघांचा जीव घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गस्त सुरू केली असून, पब आणि बारवर पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरवात केली आहे. पबमधील युवक-युवतींना आधारकार्ड मागताच त्यांची धांदल उडाल्याचे पाहायला मिळत आहे. नियमांचे उल्लघंन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा फास राज्य उत्पादन शुल्क […]
अधिक वाचा...पुणे कार अपघात प्रकरणी निबंध लिहायला लावणारे धनावडे यांना पत्रकारांनी घेरले अन्…
पुणे : पुणे शहरातील कल्याणी नगर अपघात प्रकरणातील धनिकपुत्र अल्पवयीन कारचालकाला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटींवर अवघ्या पंधरा तासांत जामीन देणारे बाल न्याय मंडळाचे सदस्य एल. एन. धनावडे हे गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात होते. पोलिस अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’ गुरुवारी (ता. ३०) ते माध्यमांच्या प्रतिनिधींच्या नजरेस पडले. यावेळी पोर्शे घटनेसंदर्भात त्यांना प्रश्न विचारले […]
अधिक वाचा...ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…
पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी ‘दिशा भोईटे मृत्यू आणि ससूनमधील शवविच्छेदन अहवाल… ‘ या शिर्षकाखाली एक लेख लिहीला आहे. संबंधित लेख मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. संबंधित लेख जसाची तसा पुढील प्रमाणे… दिशा भोईटे मृत्यू आणि ससूनमधील शवविच्छेदन अहवाल… माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे २९ ऑगस्ट […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; वडील, आजोबानंतर आता आईलासुद्धा होणार अटक?
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर महागडी पोर्शे कार चालवत असलेल्या धनिक पुत्राने दोघांचे बळी घेतल्यानंतर दरररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांसह वॉर्डबॉयला निलंबित केले आहे. तर डीनला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आता अल्पवयीन मुलाच्या वडील आणि आजोबानंतर त्याच्या आईलासुद्धा अटक केली जाण्याची शक्यता आहे. वडील […]
अधिक वाचा...सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) सविता ढमढेरे या गेल्या २६ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. आजोबा शिक्षक, वडील लष्करामध्ये असल्यामुळे वर्दीचे लहानपणापासून आकर्षण होते. पहिल्या प्रयत्नातच एमपीएससीची परीक्षा पास झाल्या आणि शिरूर तालुक्यातील पहिल्या महिला पोलिस अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळविला. त्यांच्याविषयी थोडक्यात… सविता ढमढेरे यांचे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोंढापुरी हे गाव. वडील लष्करात असल्यामुळे बालपण […]
अधिक वाचा...भारती विद्यापीठ पोलिसांनी खून करून पसार झालेल्या आरोपीस शिताफीने पकडले…
पुणे (संदिप कद्रे): जमिनीच्या वादातून खुन करुन पसार झालेल्या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने पकडले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कात्रज ते नवले बीजकडे जाणारे रोडवर दत्तनगर बस स्टॉपजवळ हायवेलगत, आंबेगाव बुद्रुक पुणे येथे दोन अनोळखी व्यक्तींनी ०५/०५/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजणेच्या सुमारास कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी फिर्यादी यांचे वडील विलास जयवंत बांदल (वय ५५) […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांसह वॉर्डबॉयचे निलंबन…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाचे धागेदोरे आता ससून हॉस्पिटलपर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणी आता ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी 2 डॉक्टर आणि वॉर्ड बॉयचे निलंबन करण्यात आले आहे. डॉ. अजय तावरे, श्रीहरी हळनोर आणि वॉर्डबॉय अतुल घटकांबळेवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात वरिष्ठ डॉक्टरांनीही गैरकृत्य केल्याचा प्रकार […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे कार अपघात, रक्त बदल आणि ससूनमध्ये चमचमीत बिर्याणीची चर्चा…
पुणे : कल्याणीनगर पोर्शे कार चालवणारा अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणात ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक झाली आहे. या धक्कादायक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने एक विशेष तपास पथक नियुक्त केले आहे. जे.जे. हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे त्याच्या अध्यक्षपदी आहेत. पण डॉ. पल्लवी सापळेयांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने वाद निर्माण झाला आहे. आता त्यात आणखी […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांचे हायटेक पाऊल! AI द्वारे जिवंत करणार पोर्शे अपघाताची घटना…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर अपघातातील दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या (AI) मदतीने प्रत्यक्ष अपघाताचा व्हिडिओ तयार करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी ‘एआय’मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे. कल्याणीनगरमध्ये भरधाव आलिशान पोर्शे […]
अधिक वाचा...
