मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवणे सीईओंना भोवले; निलंबीत…

पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील (एन. के. पाटील) यांनी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उप सचिव अनिरुध्द जेवळीकर यांनी हे आदेश काढले आहेत.

1 जून रोजी एन. के. पाटील यांनी धोकादायक पद्धतीने चारचाकी वाहन चालवत तळेगाव येथे दोन वाहनांना धडक दिली होती. तपासात त्यांनी मद्याचे सेवन केले असल्याचे आढळून आले होते. तसा अहवाल न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेतून प्राप्त झाला होता. एन. के. पाटील यांचे महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत असलेले वागणे हे अशोभनीय व असभ्य पणाचे असल्याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांनी नगर परिषद प्रशासन विभागाला कळविले होते. त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा व महिला कर्मचारी यांच्यासोबत असलेल्या अशोभनीय वर्तणुकीचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला होता. त्यांच्या या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होत असल्याने त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

दरम्यान, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा तथा एन. के. पाटील यांच्या विरोधात स्थानिक नागरिक, नगर परिषदेतील कर्मचारी व अनेक सामाजिक संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे, त्यांची गेल्या एक डिसेंबरला पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुदतपूर्व बदली करण्यात आली होती. मात्र, त्याला ‘मॅट’मध्ये आव्हान देत पाटील आठवडाभरातच पुन्हा रुजू झाले होते.

पाटील यांच्या वादग्रस्त कारकिर्दीबद्दल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके हे देखील याप्रकरणी लक्षवेधी मांडणार होते. मात्र, तत्पूर्वीच, त्यांचे निलंबन झाले. पुढील आदेश निघेपर्यंत पाटील हे निलंबित राहणार आहेत. या कालावधीत पाटील यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात राहावे लागणार असून पूर्वपरवानगी शिवाय जिल्हाधिकारी कार्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. खासगी नोकरी अथवा कोणताही व्यवसाय करण्यास बंदी आहे. अन्यथा दोषी समजून कारवाई करण्यास पात्र होणार तसेच निर्वाहभत्ता मिळण्याचा हक्क ते गमावणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

हाथरस प्रकरण! भोले बाबा फक्त सुंदर महिलांनाच जवळ ठेवायचा अन्…

महाराष्ट्रात डॉक्टरची महिलेला मध्यरात्री विवस्त्र करुन मारहाण…

हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले…

वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!