पोलिस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

पुणे : पुणे शहर पोलीस भरतीदरम्यान एक उमेदवार चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तुषार बबन भालके (वय 27, रा. कोठे बुद्रूक, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. 5 दिवसांपूर्वीच मुंबईतही पोलिस भरतीदरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील युवकाचा मृत्यू झाला होता.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

पुणे येथे सुरू असलेल्या पोलिस भरती दरम्यान तुषार भालके धाव चाचणीत धावत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला. दरम्यान त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटणेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भालके कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळले आहे.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पुण्यात शिवाजीनगर पोलिस ग्राऊंडवर पोलिस भारती प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, आज (शनिवार) सकाळी 8 वाजताच्या सुमारास तुषार भालके या युवकाने रनिंगचे तीन राऊंड पूर्ण केले. पण धावत असताना त्याच्या पायात अचानक क्रँम्प आला, मस्सल ब्रेक झाले आणि तो जागीच कोसळला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित पोलिस भर्ती अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला अँम्ब्युलन्समधून पुण्यातील ससून रुग्णालयात नेले. पण डिहायड्रेशन होऊन प्रथम त्याच्या किडनी फेल झाल्या आणि मग ह्रदय बंद पडले. आणि त्यातच मल्टिपल ऑर्गन फेलुअर होऊन त्याचा उपचारादरम्यान दूर्दैवी अंत झाला. पोलिस भर्ती दरम्यान युवकाचा दुर्दैवी अंत होण्याची राज्यातली ही तिसरी घटना आहे. यापूर्वी एसआरपीएफच्या भर्तीत मुंबईत दोन युवक दगावले आहेत. त्यानंतर आज पुण्यात हा तिसरा प्रकार घडला आहे.

हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी धावताना अक्षय जमीनीवर कोसळला अन्…

पोलिस भरतीदरम्यान गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी; पाहा कधी…

पोलिस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती…

बीड मध्ये पोलिस भरतीदरम्यान धक्कादायक प्रकार उघड…

पोलिस भरतीबाबत निलेश लंके यांची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी…

पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलिस दलाचा मोठा निर्णय…

महाराष्ट्र राज्य पोलिस दलात 17471 रिक्त जागांवर भरती; पाहा सविस्तर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!