पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न…

पुणे : पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला असून, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे.

पुणे शहरातील फरासखाना वाहतूक पोलिस स्टेशन समोर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. फरासखाना वाहतूक पोलिस स्टेशन समोर शुक्रवारी (ता. ५) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असताना महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न एका वाहनचालकाने केला होता.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. आरोपी संजय फकिरा साळवे (रा. पिंपरी चिंचवड (मूळगाव- जालना)) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने दारू पिऊन हे धक्कादायक कृत्य केले असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या फरासखाना वाहतूक पोलिस स्टेशन समोर सुरू होती. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याने एका गाडीला थांबवले आणि गाडीची तपासणी केली. त्यावेळी ड्रायवर मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर ड्रायव्हरने महिला पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

पुणे पोर्शे कार प्रकरणातील आजोबा आणि बापाला जामीन; पण…

पुणे शहरात मोबाईल व लॅपटॉप चोरणाऱ्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश…

पुणे शहरात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; टँकरनं अनेकांना उडवले…

पुणे शहरात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही युवकांची पटली ओळख…

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याचा राग; मुलाच्या वडिलांनाच संपवले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!