पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एलओसीवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला असून, भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) अनेक पाकिस्तानी चौक्यांवर रात्रीच्या सुमारास गोळीबार सुरू होता. […]
अधिक वाचा...भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताकडून तयारी सुरू असताना भारत पाकिस्तान सीमेवर एक जवान अचानक सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेला आहे. या जवानाना पाकच्या सैन्याने ताब्यात घेतले आहे. फिरोजपूर स्थित सीमारेषेवरील ही घटना घडली आहे. भारत-पाकिस्तान बॉर्डरवरील फिरोजपूर स्थित झिरो लाईन पार करुन बीएसएफचा […]
अधिक वाचा...लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा उजवा अबू कटाल याची हत्या…
लाहोर (पाकिस्तान): मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड, लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा उजवा अबू कटालची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली आहे. त्याशिवाय आणखी एकाला कंठस्नान घालण्यात आले आहे. ही व्यक्ती हाफिज सईद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि पाकिस्तानी हँडलवर हाफिज सईदवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला […]
अधिक वाचा...पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, रेल्वे हायजॅक ; 6 जवान ठार, प्रवासी ओलीस…
लाहोर (पाकिस्तान): बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक केली असून 6 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे. रेल्वेमधील प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला हायजॅक करण्यात आले आहे. बलूच आर्मीकडून 6 पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले आहे. स्वंतत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच बिलरेशन आर्मी कार्यरत आहे. वेगळ्या बलुचिस्तानसाठी त्यांचा […]
अधिक वाचा...पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय जवानाला अटक…
चंदीगड (पंजाब): पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी भारतीय लष्कराच्या जवानाला पंजाब पोलिसांनी केली आहे. नाशिक आर्मी कँटान्मेंटमध्ये तैनात असताना पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. आरोपी जवान हा नाशिकमधील भारतीय लष्कराच्या कँटान्मेंटमध्ये तैनात होता. संदीप सिंह असे हेरगिरी करणाऱ्या जवानाचे नाव आहे. संदीप सिंह याने आयएसआयला नाशिक, जम्मू […]
अधिक वाचा...विद्यार्थीनी 32 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली अन्…
कराची (पाकिस्तान): पाकिस्तानमध्ये एक 20 वर्षांची विद्यार्थीनी तिच्यापेक्षा 32 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली. तिने प्राध्यापकांना प्रपोज केले. पण त्यांनी त्यास नकार दिला. मात्र, नंतर ते प्राध्यापक देखील तरुणीच्या प्रेमात पडले व त्या दोघांनी लग्न केलं. दोघे मिळून आता लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. झोया नूर असे या 20 वर्षीय युवतीचे नाव असून तिच्या […]
अधिक वाचा...भारतातील युवतीचे पाकिस्तानी युवकासोबत ऑनलाइन लग्न; पुन्हा भारतात परतली अन्…
मुंबई : ठाण्यातील एका युवतीची सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील युवकासोबत ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर तिने पाकिस्तान गाठले आणि युवकासोबत लग्न केले. १७ जुलै रोजी ती परत भारतात आली असून, ठाणे पोलीस तिची चौकशी करत आहेत. ठाण्यातील एका युवतीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद येथे जावून लग्न केले. पाकिस्तान रावलपिंडी येथे […]
अधिक वाचा...सीमा हैदर हिचा नवरा गुलाम भारतात येणार; मोठं कारण समोर…
नवी दिल्ली : पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर हिचा नवरा गुलाम हैदर हा भारतात येणार आहे. गुलाम हैदर याने सीमा हैदर, सचिन मीणा आणि त्यांचे वकील डॉक्टर एपी सिंह यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यासंदर्भांत साक्ष देण्यासाठी तो उत्तर प्रदेशातल्या गौतमबुद्धनगरच्या सूरजपूर सेशन कोर्टात आपली साक्ष नोंदवण्यासाठी येणार आहे. मानहाीनीचा खटला दाखल केल्यानंतर […]
अधिक वाचा...शोएब मलिक तिसऱ्यांदा लग्नासाठी ‘खुला’; सानिया मिर्झा म्हणाली…
कराची (पाकिस्तान): पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक (वय ४१) याने तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शोएब मलिकने सना जावेद हिच्या सोबतच्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर शोएबपासून सानियाच्या घटस्फोटाची अफवा खरी ठरली आहे. शिवाय, सानियाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे. सानिया हिने शोएबला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. निवेदनात सानियाची टीम […]
अधिक वाचा...इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक…
इस्लामाबाद : इराणने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. बलुचिस्तानमधील पंजगुरमध्ये हा हवाई हल्ला करण्यात आला. जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केल्याची माहिती इराणकडून देण्यात आली आहे. पाकिस्ताने इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. भारताप्रमाणेच इराणनेही एअरस्ट्राइक करत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. बलूचिस्तानातील पंजगुरमध्ये हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर इरानने […]
अधिक वाचा...
