विद्यार्थीनी 32 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली अन्…

कराची (पाकिस्तान): पाकिस्तानमध्ये एक 20 वर्षांची विद्यार्थीनी तिच्यापेक्षा 32 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली. तिने प्राध्यापकांना प्रपोज केले. पण त्यांनी त्यास नकार दिला. मात्र, नंतर ते प्राध्यापक देखील तरुणीच्या प्रेमात पडले व त्या दोघांनी लग्न केलं. दोघे मिळून आता लाखो रुपयांची कमाई करीत आहेत.

झोया नूर असे या 20 वर्षीय युवतीचे नाव असून तिच्या प्राध्यापकाचे नाव साजिद अली आहे. यासंबंधीची एक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. लव्ह मॅरेज की अरेंज, कोणतं मॅरेज जास्त टिकतं? तज्ज्ञांनी सांगितलं कोणतं लग्न बेस्टनेमका काय आहे प्रकार? पाकिस्तानमधील हा प्रकार 2022 पूर्वीचा आहे. 2022 मध्ये या दोघांनी त्यांची प्रेमकहाणी पाकिस्तानी युट्युबर सय्यद बासित अली यांच्याशी शेअर केली होती.

झोयाने सांगितले होते की, ‘मी माझ्यापेक्षा 32 वर्षांनी मोठे असलेले प्राध्यापक साजिद अली यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडले होते. पण साजिद यांनी वयाचे कारण देत माझ्या प्रपोजलला नकार दिला. ते म्हणाले होते की, ‘मी तुझ्यापेक्षा 32 वर्षांनी मोठा आहे. त्यामुळे आपल्या दोघांचं लग्न होऊ शकत नाही.’ मात्र मी माझे प्रयत्न सुरूच ठेवले, व त्यांच्यासमोर वारंवार लग्नाचा प्रस्ताव ठेवला. अखेर त्यांनी एक आठवड्याचा वेळ मागितला. आठवड्याभरानंतर साजिद यांनी माझ्याशी लग्न करायचे ठरवले होते.

दरम्यान, दोघांच्या विवाहाची जोरदार चर्चा झाली होती. दोघेही आज संसारात मग्न आहेत.

प्रेम! पाकिस्तानात गेलेली अंजू लागली रडू म्हणतेय भारतात जायचे…

परदेशी प्रेम! भारतीय वकीलाचे पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न…

पाक महिला प्रियकराला भेटण्यासाठी मुलांसह आली भारतात अन् पुढे…

भारतातील युवतीचे पाकिस्तानी युवकासोबत ऑनलाइन लग्न; पुन्हा भारतात परतली अन्…

Video: पाकिस्तानमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!