पुणे! उच्चपदस्थ शासकीय अधिकारी अडकला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अन्…

पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीनंतर एका उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्याची महिलेने तब्बल ४२ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. मुंबईतील एका ४३ वर्षीय जीएसटी (GST) अधिकाऱ्याला नागपूरच्या महिलेने प्रेमाच्या अडकवून हे कृत्य केले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित अधिकाऱ्याची २०२३ मध्ये मॅट्रिमोनिअल साईटवर नागपूरमधील एका महिलेशी ओळख झाली होती. सुरुवातीला गोड बोलून विवाहाचे आमिष दाखवत महिलेने अधिकाऱ्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर घरगुती आणि वैयक्तिक कारणांचे निमित्त साधून तिने पैसे मागण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्याने आतापर्यंत वेळोवेळी एकूण ४२ लाख ८७ हजार रुपये दिले आहेत.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

अधिकाऱ्याला जेव्हा संशय आला आणि त्यांनी पैशांचा जाब विचारला, तेव्हा या महिलेने आपल्या साथीदारांसह मिळून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. “बलात्काराची खोटी फिर्याद देऊन तुला आयुष्यभर तुरुंगात सडवू,” अशी धमकी देऊन आरोपींनी अधिकाऱ्याकडे पुन्हा ७ लाख रुपयांची खंडणी मागितली. या सततच्या मानसिक त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर अधिकाऱ्याने पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेतली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. उच्चपदस्थ अधिकारी अशा प्रकारे हनी ट्रॅपमध्ये अडकल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. “अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना सावध राहावे,” असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…

शिक्षिकेने ओढलं विद्यार्थिनीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात अन् स्वतःच अडकली…

वृद्ध व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले; एका खोलीत घेऊन गेली अन्…

पुणे! वृद्धाला ‘व्हर्च्युअल कोर्टरूम’मध्ये डिजिटल अरेस्ट करणारे दोघे ताब्यात…

पुणे! महिलेने मॅट्रिमोनी साईटवर नावनोंदणी केली अन् तिथेच फसली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!