
खुनाचा बदला! पुणे गुन्हे शाखा युनिट ०२ने आरोपीला पिस्टलसह घेतले ताब्यात…
पुणेः शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेणेकामी दाखल असलेल्या गुन्हयातील रेकार्डवरील पाहिजे आरोपीस १ पिस्टल व ०२ काडतुसासह गुन्हे शाखा युनिट ०२ कडून जेरबंद करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर…
www.puneganpati.com
गुन्हे शाखा युनिट ०२ कडील अधिकारी व अंमलदार १९/०५/२०२५ रोजी गस्त करीत होते. पोलिस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या अनुषंगाने शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेणेस प्रत्युत्तर देणेकामी कट रचलेबाबत खराडी पोलिस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर क्रमांक ०३ /२०२५ बी.एन.एस. १११, ६१ (ब) आर्म अॅक्ट ३ (२५) मधील रेकार्डवरील आरोपी ओंकार सचिन मोरे (वय २३ वर्ष रा. मुठा कॉलनी पुणे) यास सापळा रचून चारनल सुतारदरा कोथरूड पुणे येथून ४०,८००/- रु. किमतीचे १ गावठी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतूसासंह ताब्यात घेतले. कोथरुड पोलिस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि. क्रमांक १३५/२०२५ आर्म अॅक्ट ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रताप मानकर: खेळ आणि वैचारीक खुराकाची सांगड घालणारा अधिकारी!
सदरची कामगिरी पोलिस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे १ गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, पोउपनि नितीन कांबळे, पोलिस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, नागनाथ राख, ओमकार कुंभार, हनुमंत कार्बळे, अमोल सरडे, विनोद चव्हाण, गणेश थोरात, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण व नागेश राख यांनी केली आहे.
पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…
पुणे शहरात शिंदे गटाच्या नेत्याच्या कारवर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार…
पुणे! मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे मंगळसूत्र हिसकवणारा १२ तासाच्या आत ताब्यात…
पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…
Video: पुणे शहरात भरदिवसा युवकावर कोयत्याने सपासप वार…

