भाकरी पुन्हा करपली! विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने पोस्ट व्हायरल अन् मोठा खुलासा…

मुंबई : IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्या पोस्टमध्ये नांगरे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधल्याचे भासवण्यात आले आहे. परंतु सोशल मीडियावर पसरणाऱ्या या दाव्याचं नांगरे पाटील यांच्याकडून खंडन करण्यात आले आहे. सर्व दावे निराधार आहेत, खोटे आहेत, असे सांगण्यात आले आहे.

विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संबंधित व्हायरल होत असलेल्या फोटोवर महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने खुलासा केला आहे. नांगरे पाटील यांनी असे वक्तव्य केलं नसून हा कोणाचा तरी खोडसाळपणा असल्याचे समोर आले आहे. भाकरी करपली, भाकरी करपतच राहिली असे म्हणत #IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी व्यवस्थेवर भाष्य केल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या कोणत्याही भाषणात किंवा मुलाखतीत असे वक्तव्य केल्याचे आढळत नाही. या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं आहे…
भाकरी करपली..
आचारी म्हणाला, तवा बदला
भाकरी पुन्हा करपली
आचारी म्हणाला, पाणी बदला
पुन्हा तेच… भाकरी पुन्हा करपलीच
आचारी म्हणाला, चूल बदला
तरीदेखील परिणाम शून्यच
भाकरी करपतच राहिली
पण एकाची देखील
आचारी बदला
म्हणण्याची हिंमत झाली नाही!
हीच स्थिती सध्या देशाची झाली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सरकारने केले आहे. काही तासांत लाखो लोकांपर्यंत पोहोचलेल्या संदेशांमुळे संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची खातरजमा करुनच पुढे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IPS विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला आशाताईंचा किस्सा…

IPS विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून 78 लाख रुपयांना लुटलं…

Digital Arrest! IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; कोटींचा गंडा…

हृदयद्रावक! विश्वास नांगरे पाटील यांनी नितीन देसाईंबद्दलच्या भावनांना करून दिली मोकळी वाट…

दादा मिश्किलीने म्हणाले, ‘आयला गडबड झाली, आता चोरांना पॉश लॉक अप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!