राज्यात पोलिस दलात मोठे बदल; 24 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

पुणे : राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 24 IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. फडणवीस सरकारकडून पोलीस प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच असून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

राज्याच्या पोलीस दलात मोठे बदल झाले असून, आज झालेल्या बदल्यांमध्ये पोलीस सह आयुक्त, अप्पर पोलीस महासंचालक समावेश आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या 24 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिकचे वादग्रस्त आयजी दत्ता कराळे यांचीही बदली करण्यात आली आहे. ज्योतिप्रिया सिंह ॲंटीनार्कोटिक्स च्या प्रमुख तर मंत्री मेघना बोर्डीकर यांचे पती दिपक साकोरे नवी मुंबईच्या सह पोलिस आयुक्तपदी बढती करण्यात आली आहे.

अधिकाऱ्याचे नाव विद्यमान पदस्थापना बदली पदस्थापना
कृष्ण प्रकाश अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण)
दत्ता कराळे विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य मानवी हक्क आयोग
प्रविण पडवळ विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र
लखमी गौतम पोलीस सह आयुक्त (गुन्हे), बृहन्मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य
मनोज शर्मा विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), बृहन्मुंबई
सुवेझ हक विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) पोलीस सह आयुक्त (प्रशासन), मुंबई
महेश पाटील अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय), महाराष्ट्र राज्य (पदोन्नतीने)
परमजीत दहिया अपर पोलीस आयुक्त, मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक (पदोन्नतीने)
सी.के. मीना विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र
संजय दराडे विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र पोलीस सह आयुक्त, पुणे

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

रंजन शर्मा पोलीस सह आयुक्त, पुणे विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र
सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व)
निशिथ मिश्रा पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण
जय कुमार पोलीस सह आयुक्त (प्रशासन), मुंबई शेष पोलीस महानिरीक्षक, फोर्स वन (पद अवनत करून)
संजय येनपुरे पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक, व्ही.आय.पी. सुरक्षा
संजय जाधव अपर पोलीस आयुक्त, ठाणे अपर पोलीस आयुक्त, ठाणे (In Situ Promotion)
दिपक साकोरे अपर पोलीस आयुक्त, नवी मुंबई पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई (पदोन्नतीने)
पंजाबराव उगले अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस गृह निर्माण महामंडळ (पद अवनत करून)
एस. व्ही. पाठक अपर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे विशेष पोलीस महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे), पुणे
विनायक देशमुख अपर पोलीस आयुक्त, ठाणे नियंत्रक, वैधमापन (पद अवनत करून)

राज्यातील बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा नावे…

राज्यातील अनेक परिविक्षाधीन आयपीएस (IPS) अधिका-यांच्या बदल्या..

महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्य पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!