
धक्कादायक! मुलीला आणि प्रियकराला पहाटेच्या सुमारास नको त्या अवस्थेत पाहिले अन्…
अलिबाग : आई घरात झोपली असताना मुलगी तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत दिसल्यानंतर आईने आरडाओरडा केला. तेव्हा प्रियकराने तिच्या आईचे तोंड दाबून धरले. दोघांनी मिळून आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना खालापूर तालुक्यातील परखंडे येथे १० सप्टेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
परखंडे गावात अहिल्या नगरमध्ये संगीता झोरे या त्यांची मोठी मुलगी भारती आणि लहान मुलीसोबत राहत होत्या. संगीता या घरी झोपल्या असताना १० सप्टेंबरच्या पहाटे त्यांना जाग आली. तेव्हा मोठी मुलगी भारती ही तिचा प्रियकर संतोष याच्यासोबत नको त्या अवस्थेत दिसली. यावेळी संतापलेल्या संगीता झोरे यांनी आरडाओरडा करण्यास सुरवात केली. आपलं बिंग फुटेल या भितीने घाबरून संतोषने संगीता यांना जमिनीवर पाडून तोंड दाबले. त्यांच्या तोंडात ब्लँकेट घातले. मुलगी भारतीने संगीताचे पाय धरून ठेवले. यामध्ये श्वास गुदमरून संगीता झोरे यांचा मृत्यू झाला. संगीता यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आत्महत्येचा बनाव रचला. संगीता यांनी आत्महत्या केल्याचे दाखवण्याचा प्रयत्न दोघांनी केला.
मोठी मुलगी भारती (वय २०) आणि संतोष नांदगावकर (वय ३४) याने संगीता यांचा मृतदेह साडीने घराच्या छताला लटकवला. लोखंडी पाईपला मृतदेह लटकवल्यानंतर खाली लाकडी स्टूल ठेवला होता. मात्र, लहान मुलीने हा सगळा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानं हत्येच्या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसात दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरातील महिला पोलिसाचे निलंबन; धक्कादायक धमकी…
नागपूर हादरलं! प्रियकर विवाहित तर प्रेयसी अनविवाहित अखेर…
पत्नी आणि प्रियकराचा नको त्या अवस्थेतच पतीने केला खून…
घराचा दरवाजा उघडताच पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले अन् फिरलं डोकं…
नवविवाहितेला नको त्या अवस्थेत सासूने पाहिले अन् बसला धक्का; युवक निघाला…

