जवान चंदू चव्हाण यांना धुळे महानगर पालिकेत धक्काबुक्की…
धुळेः पाकिस्तानमधून सहीसलामत भारतात आलेले जवान चंदू चव्हाण यांना धुळे महापालिकेत आज (शनिवार) पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी पालिकेमध्ये अधिकारी उपस्थित होते. या घटनेमुळे आजी-माजी जवानांमध्ये खळबळ उडाली आहे. जवान चंदू चव्हाण हे सध्या पठाणकोठ येथे लष्करात कार्यरत असून, सध्या ते सुट्टीवर आले आहेत. लष्करामध्ये कार्यरत असलेल्या जवानांसाठी व सेवानिवृत्त झालेल्या जवानांना घराचा […]
अधिक वाचा...प्रशिक्षणार्थी १५० पोलिसांना जेवन केल्यानंतर विषबाधा…
धुळेः धुळ्यात 100 ते 150 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी जवानांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, उपचारानंतर जवानांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती समोर येत आहे. धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या 630 प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. गुरूवारी संध्याकाळी जवानांना मेसमधून जेवण देण्यात आले. हे […]
अधिक वाचा...मामाने चिमुकल्या भाच्याला पाण्यात बुडून ठार मारले; कारण…
धुळे : चिमुकला भाचा सतत रडत असल्यामुळे मामाने भाच्याला ड्रममध्ये बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घटना फिरदोस नगर येथे घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी नुरूल अमीन (वय 22) या मामाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरदोस नगरातील रातराणी चौकात राहणारी मरियम बी एजाज हुसेन ही महिला आपल्या माहेरी गेली होती. […]
अधिक वाचा...प्रेयसीने दरोडा अन् अपहरणाचा रचला बनाव, पोलिसांनी लावला शोध…
धुळे : साक्री येथील दरोडा आणि तरुणीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित युवतीनेच ओळखीच्या प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता, हे पोलिस तपासादरम्यान उघड झाले आहे. पीडित युवतीनेच पोलिसांना अशी माहिती दिली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे दिली. साक्री येथील सरस्वती नगरमधील घरात पाच ते सात दरोडेखोरांनी घुसून महिलेला […]
अधिक वाचा...धुळे जिल्ह्यात सशस्त्र दरोडा, युवतीचे अपहरण करून घेऊन गेले…
धुळे : साक्री येथे पाच ते सात दरोडेखोरांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून सोने चांदीच्या दागिन्यांसह 23 वर्षीय युवतीचे अपहरण केल्यामुळे धुळे जिल्ह्यात मोठी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. साक्री शहरात एका घरात अज्ञातांनी दरोडा टाकून 88 हजार 500 रुपये किमतीचे दागिने लुटले. […]
अधिक वाचा...युवतीची धारदार शस्त्राने गळा चिरुन घरातच हत्या…
धुळे : धुळे शहरातील नकाने परिसरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या मागे असलेल्या बालाजी नगर येथे एका युवतीची गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २२) सांयकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास करत आहेत. निकिता पाटील (वय २२) असे या […]
अधिक वाचा...गौतमी पाटील हिने घेतली वडिलांची दखल; नात्याबाबत सांगितले की…
पुणे: नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस अवस्थेत आढळून आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर चर्चांना उधाण आले होते. यानंतर गौतमीने वडिलांची दखल घेतली आहे. माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य तेवढे मी नक्की करेन, असे ती म्हणाली आहे. रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव असून […]
अधिक वाचा...धुळे जिल्ह्यात दोन गटात राडा; दगडफेकीत 15 पोलिसांसह स्थानिक जखमी…
धुळे : धुळे जिल्ह्यातील सांगवी (शिरपूर) येथे गुरुवारी (ता. 10) सायंकाळच्या सुमारास बॅनर फाडण्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत 15 पोलिस कर्मचारी आणि तीन ते चार स्थानिक नागिरक किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी 150 ते 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी 13 जणांना अटक […]
अधिक वाचा...
