धक्कादायक! चेटकीण समजून जमावानं जिवंत जाळलं…

सोनितपूर (आसाम) : जादूटोण्याच्या संशयावरून चेटकीण समजून सहा जणांच्या टोळक्याने एका महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करून जिंवत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

सोनितपूर जिल्ह्यातील बहबरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. संगीता कपि असे मृत महिलेचे नाव आहे. संगीता ही तीन मुलांची आई होती. ती जादूटोणा करते असा संशय शेजाऱ्यांना होता. याच संशयातून हे हत्याकांड घडले आहे. सहा जणांच्या टोळक्याने तिच्यावर आधी धारदार शस्त्राने हल्ला केला आणि नंतर तिला जिवंत जाळण्यात आले.

सोनितपूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मधुरिमा दास यांनी सांगितले की, ‘चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन जण फरार आहेत. यातील तीन जणांना 24 डिसेंबरला रात्री अटक करण्यात आली तर एकाला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तेजपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे.’

धक्कादायक! जावयाने पत्नीच्या संशयावरून आख्खी सासुरवाडी संपवली…

धक्कादायक! छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच केली आत्महत्या…

धक्कादायक! चुलत्याचे मुंडके दुचाकीवर ठेवून गावभर फिरत राहिला…

धक्कादायक Video: युवकाला ६० वेळा भोसकले अन् मृतदेहासमोर नाचलाही…

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!