युवतीची धारदार शस्त्राने गळा चिरुन घरातच हत्या…
धुळे : धुळे शहरातील नकाने परिसरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या मागे असलेल्या बालाजी नगर येथे एका युवतीची गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २२) सांयकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास करत आहेत.
निकिता पाटील (वय २२) असे या मृत युवतीचे नाव आहे. धुळे शहरातील नकाने रोड येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या बालाजी नगर येथे ही मृत युवती वास्तव्यास होती. ती महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घरी एकटी असल्याचे संधी साधत अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात शिरून गळ्यावर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तिची निर्घुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही दुर्देवी झाली त्यावेळी निकिताचे आई-वडील आणि भाऊ हे तिघेही कामानिमित्त बाहेर गेले होते. घटनेबाबत माहिती मिळतात परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. पोलिसांना माहिती समजल्यानंतर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.
निकिता कल्याण पाटील या युवतीची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके पाठवली आली आहेत. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांच्या पथकाकडून पुरावे गोळा करण्यात आले आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्यात येईल अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली आहे.
युवतीची बलात्कारानंतर आत्महत्या; फरार संशयिताचा आढळला मृतदेह…
वर्धा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून युवतीची घराबाहेरच हत्या; गावकऱ्यांनी…
गुढ वाढले! वसतीगृहात युवतीची हत्या अन् सुरक्षा रक्षकाची आत्महत्या…
पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…
धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!