
जवान चंदू चव्हाण यांना धुळे महानगर पालिकेत धक्काबुक्की…
धुळेः पाकिस्तानमधून सहीसलामत भारतात आलेले जवान चंदू चव्हाण यांना धुळे महापालिकेत आज (शनिवार) पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी पालिकेमध्ये अधिकारी उपस्थित होते. या घटनेमुळे आजी-माजी जवानांमध्ये खळबळ उडाली आहे.
जवान चंदू चव्हाण हे सध्या पठाणकोठ येथे लष्करात कार्यरत असून, सध्या ते सुट्टीवर आले आहेत. लष्करामध्ये कार्यरत असलेल्या जवानांसाठी व सेवानिवृत्त झालेल्या जवानांना घराचा कर माफ करण्यात आल्याचा निर्णय झाला आहे. परंतु, धुळे नगर पालिका गेल्या दोन वर्षांपासून जवानांकडून कर आकारात आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मला धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आले आहे. देशाची सेवा करणाऱ्या जवानांना सरकारी महापालिकेत अशी वागणूक मिळत असल्याचे दुःख आहे, असे जवान चंदू चव्हाण म्हणाले.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पाकिस्तानमधून सहिसलामत सुटून आल्यानंतर जवान चंदू चव्हाण यांना संपूर्ण देशाने डोक्यावर घेतले होते. चंदू चव्हाण यांच्या घरासमोरून ड्रेनेज गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा त्रास होत आहे. याबाबत आवाज उठवल्यानंतर धक्काबुक्की करण्यात आली आहे, असे चंदू चव्हाण म्हणाले.
दरम्यान, धुळे महापालिक्या आयुक्त अनिता दगडे पाटील यांच्या समोर ही घटना घडली आहे. जवान चंदू चव्हाण यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ सोमवारी (ता. २२) महापालिकेपुढे नागरिक आंदोलनला बसणार आहेत.
पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक…
जवान संदीप मोहिते अनंतात विलीन; काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश…
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
Video: हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना जवानांकडू अनोखी मानवंदना!
Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

