प्रशिक्षणार्थी १५० पोलिसांना जेवन केल्यानंतर विषबाधा…

धुळेः धुळ्यात 100 ते 150 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी जवानांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, उपचारानंतर जवानांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती समोर येत आहे.

धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या 630 प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. गुरूवारी संध्याकाळी जवानांना मेसमधून जेवण देण्यात आले. हे जेवण केल्यानंतर मैदानात नियमित रोल कॉलसाठी हे पोलीस जवान हजर झाले. मात्र, जवानांचा रोल कॉल सुरू होताच अनेक जवानांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जास्त त्रास होत असल्याने जवानांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी जवानांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, उपचारानंतर जवानांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या विषबाधा प्रकरणाची पोलिस अधीक्षक धुळे यांनी देखील पुष्टी केली आहे. ज्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चिकन खाणाऱ्या 41 पोलिसांना विषबाधा; रुग्णालयात दाखल…

ड्राय आईस! हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या…

पोलिस स्टेशनमध्येच पोलिसकाकावर कुऱ्हाडीनं सपासप वार…

गोंदियामध्ये मृत पोलिसकाकाच्या कुटुंबियांना धनादेशाचे वाटप…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!