संतापजनक! बालकाच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरद्वारे हवा भरल्याने मृत्यू…

धुळे : एका टायर पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकाच्या गुदद्वारात दोघांनी कॉम्प्रेसरद्वारे हवा भरल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल सिटी पॉईंटच्या आवारात घडली आहे. बालकाची मस्करी करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लळींग शिवारातील सिटी पॉईंट हॉटेलच्या आवारात मोहम्मद मुजाहिद आलम याचे टायर पंक्चरचे दुकान आहे. या दुकानात त्यांच्यासोबत त्यांचा नातेवाईक असलेला 14 वर्षीय मुलगा हा देखील काम करत होता. त्यांच्या दुकानाशेजारीच गॅरेज असून त्या ठिकाणी रोहित राजू चंद्रवंशी आणि शिवाजी लक्ष्मण सुळे हे दोघे काम करतात. शेजारीच दुकान असल्याने एकमेकांचे चांगले संबंध होते. सकाळी नेहमीप्रमाणे दोघांचे दुकान उघडे होते. मात्र मोहम्मद मुजाहिद आलम हे सकाळी १० वाजेच्या सुमारास कामानिमित्त घरी गेले होते. त्यामुळे बालक हा दुकानात एकटाच होता. यावेळी शिवाजी सुळे आणि रोहित यांनी त्याची मस्करी करताना त्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसर मशीनने हवा भरली.

बालकाचा पोटात जोरात हवा गेल्याने त्याला त्रास होवू लागला. त्यानंतर शिवाजी आणि रोहित या दोघांनीच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र बालकाच्या आतड्यांना आणि नसांना दुखापत झाल्याने ऑपरेशन करावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, ऑपरेशन थिएटरमध्ये नेले असता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

गंमत! मित्रांनी भरली प्रायव्हेट पार्टमध्ये हवा अन् क्षणातच…

संतापजनक! पत्नीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट…

रशियात डॉक्टर होण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू…

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…

धक्कादायक! पोलिसकाकाला नाकाबंदीदरम्यान ट्रकने चिरडले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!