पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…

धुळे : नागपूर-सुरत महामार्गावरील आनंद खेडा गाव शिवारात झालेल्या अपघातात साक्री पोलिस ठाण्याचे कर्मचारी गुलाब शिंपी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुलाब शिंपी हे आपली ड्युटी करुन गावाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.

धुळ्याच्या साक्री पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी गुलाब शिंपी हे आपल्या दुचाकीवरून घरी निघाले होते. नागपूर-सुरत महामार्गावर पुढे सळई घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने भीषण अपघात झाला. दुचाकी धडकून गुलाब शिंपी यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत गुलाब शिंपी यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करीत त्यांना मृत घोषित केले. सन 2014 मध्ये गुलाब शिंपी हे पोलिस खात्यात भरती झाले होते, सध्या ते साक्री पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

गुलाब शिंपी यांच्या अपघाती निधनामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय, पोलिस खात्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुलाब शिंपी यांच्या मागे आई, वडिल, पत्नी, 5 वर्षांची मुलगी, 3 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. गुलाब शिंपी हे धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात वास्तव्यास होते. ते गावावरुन दुचाकीने दररोज नागपूरमधील साक्री पोलिस ठाण्यात कर्तव्यावर येत होते. काल रात्रीची नाईट शिफ्ट संपल्यानंतर आज सकाळी ते साक्रीहून घराकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. त्यामध्ये, त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाकाने नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे केली आत्महत्या…

धक्कादायक! पोलिसकाकाला नाकाबंदीदरम्यान ट्रकने चिरडले…

पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले की…

पोलिसकाकाचा हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्यामागे ठेचून खून…

पोलिसकाकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!