तुळजापूरमधील सरपंचाने स्वत:च रचला होता हल्ल्याचा बनाव; पोलिस तपासात कारण समोर…

धाराशिव: तुळजापूरमधील सरपंचावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली होती. पण, सरपंच नामदेव निकम यांची फिर्याद आणि घटनास्थळ पंचनाम्यातील तफावतीमुळे हा बनाव उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सरपंचाने बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी हल्ल्याचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सत्ता वर्चस्व दाखवण्यासाठी पिस्तूल, गन बाळगण्याचे लायसन्स मिळवण्यासाठी वाटेल ते केले जात असल्याचे समोर येत आहे. तुळजापुरातील सरपंचाने बंदुकीचा लायसन्स मिळवण्यासाठी जीवघेणा हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. बनाव रचल्याची भांडाफोड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

तुळजापूर तालुक्यातील सरपंच नामदेव निकम हे रात्री बारूळ गावातून आपल्या कारने जवळगा मेसाई गावाकडे परतत असताना दोन्ही बाजूंनी अचानक दुचाकीस्वार आले. निकम यांच्या गाडीच्या काचा फोडून आत मध्ये पेट्रोलने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या टाकत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले होते. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासात हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असल्याची माहिती समोर आली. पण, हल्ल्याचा सगळा बनाव खुद्द सरपंचानेच केला असल्याचे उघड झाले आहे.

सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःच हल्ल्याचा बनाव रचल्याच पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांची सात पथक तयार करत पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी तपासाची चक्र फिरवली होती. बंदूक परवाना मिळण्यासाठी सरपंच नामदेव निकम यांनी हा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन त्यांनी केले होते. सरपंच नामदेव निकम यांची फिर्याद आणि घटनास्थळाच्या पंचनाम्यातील तफावतीमुळे हा बनाव उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बंदूक परवाना मिळवण्यासाठी हा बनाव केल्याची माहिती समोर आली आहे. आता हा सगळा बनाव असल्याची माहिती समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रातील पुन्हा एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, जाळण्याचा प्रयत्न…

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!