
धक्कादायक! आईने घरात घेतला गळफास तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये…
धाराशिव: घरातील पत्र्याला गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केली असून, घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये तिच्या दोन्ही लहान मुलांचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राधिका घट्टे (२५) मृत महिलेचे नाव असून, श्रेया घट्टे, श्रेयस घट्टे अशी दोन्ही चिमुकल्यांची नावे आहेत.
तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे ही घटना घडली असून, पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. घटना उघडकीस आली तेव्हा दोन छोट्या बाळांचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. शिवाय, या दोन्ही बाळांची आई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे 25 वर्षीय महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये तिच्या दोन्ही बाळांचे मृतदेह तरंगताना आढळले. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांना घटनेची खबर देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरू केला असून, अद्याप मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.
घरातील पत्र्याच्या अडूला दोरीने गळफास घेत महिलेने आत्महत्या केल्याची फिर्याद मृत महिलेच्या दिराने नळदुर्ग पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला व दोन्ही बाळांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. एकाच घरातील तिघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! पहाटे झोपेत असताना पत्नीच्या डोक्यात घातला दगड…
धक्कादायक! थरकाप उडवणारी चौघांच्या हत्येची स्टोरी…
धक्कादायक! सख्खा चुलत भावाने अनैतिक संबंधातून केला बहिणीचा खून..
धक्कादायक! अहमदनगर जिल्ह्यात दिराने केली दोन वहिनींची हत्या…
धक्कादायक! शिक्षकाने केला प्राध्यापिका असलेल्या पत्नीचा खून…

