
धाराशिवमध्ये भरदिवसा कर्मचाऱ्यांना बांधून बँक लुटली…
धाराशिव : धाराशिव शहरातील मुख्य भागातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला असून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून आणि कर्मचाऱ्यांना बांधून दरोडा घातला. सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल आणि सोने चोरून नेण्यात आले आहे. सीसीटीव्हीमध्ये 4 आरोपी दरोडेखोर जाताना कैद झाले आहेत.
धाराशिव शहरातील जिल्हा स्टेडियमच्या जवळ असलेल्या सुनील प्लाझा येथील ज्योती क्रांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही बँक दिवसाढवळ्या लुटण्यात आली. घटना घडताच बँक कर्मचाऱ्यांनी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्याशी संपर्क साधून सदर घडलेली घटना सांगितली. यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, आनंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.
पाच जणांनी ज्योती क्रांती या बँकेत प्रवेश केला. यावेळी बँकेत दोन कर्मचारी उपस्थित होते. पिस्टल आणि चाकूचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले आणि लाखो रुपये, सोने लुटले. दिवसाढवळ्या बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दरोडा घातला गेल्याने खळबड उडाली आहे. चोरीला गेलेला मुद्देमाल नेमका किती आहे हे स्पष्ट झालेले नाही पण ते दोन कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे सांगितले जात आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावत बँक लुटल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आई तुळजाभवानीचा चांदीचा मुकुट गायब; गुन्हा दाखल…
बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…
तुळजाभवानी मंदिराची बनावट वेबसाईट, अॅप बनवून भाविकांना गंडा…
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद: पद्मश्री कल्याण सिंह रावत
आयपीएस अतुल कुलकर्णी: जमिनीवर राहून काम करणारा अधिकारी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

