
अतुल कुलकर्णी यांच्या पहाट उपक्रमाची न्यायालयाकडून दखल!
धाराशिव (प्रतिक भोसले): धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आलेल्या पोलिसांच्या पहाट उपक्रमाची अतिरिक्त सत्र न्यायाधीश गुप्ता यांनी दखल घेतली आहे. ढोकी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील नऊ आरोपींची तीन महिन्यात आठवड्यातून तीन दिवस पोलिस अधीक्षक कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर निर्दोष मुक्तता केली. शिवाय पहाट उपक्रमांतर्गत आरोपींना गुन्हे करणे पासून परावृत्त करण्याकरीता व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आदेश दिले आहेत.
पहाट उपक्रमाची अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धाराशिव राजेश गुप्ता यांनी देखील दखल घेत सदर कार्यक्रमाचे कौतुक करुन ढोकी पोलिस ठाणे गु.रं.नं. 369/2022 कलम 399, 402 प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी दादा उध्दव चव्हाण (वय 35), अनिल उध्दव चव्हाण (वय 30), फारुक सत्तार कोतवाल (वय 50), सुनिल उध्दव चव्हाण (वय 27), रमेश उध्दव चव्हाण (वय 25, सर्व रा. राजेशनगर ढोकी ता. जि. धाराशिव) व राहुल तानाजी पवार (वय 21, रा.तेरणा कॉलेज जवळ धाराशिव), अनिल बप्पा काळे (वय 26 ), शर्मा दादा शिंदे (वय 19, दोघे रा. पळसप), दिपक तानाजी पवार (वय 23, रा.तेर) यांची न्यायालयाने सदर गुन्ह्याच्या सुनावणी अंती पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
आरोपीचा गुन्हेगारीचा पुर्व इतिहास पाहता 2 जानेवारीच्या पत्रान्वये त्यांना पुढील 3 महिन्या करीता आठवड्याचा प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी पोलिस अधीक्षक कार्यालय येथे हजेरी लावण्याचे बंधनकारक केले असून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे “पहाट” उपक्रमा अंतर्गत त्यांना पुन्हा गुन्हे करणे पासून परावृत्त करण्याकरीता व त्यांचे पुनर्वसन करण्याकरीता त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून ‘पहाट’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे संबंधितांना वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. सोबतच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.
– अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद: पद्मश्री कल्याण सिंह रावत
आयपीएस अतुल कुलकर्णी: जमिनीवर राहून काम करणारा अधिकारी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

