प्रेम! नवरदेवाचा बाप पडला नवरीच्या आईच्या प्रेमात अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): नवरदेवाचा बाप नवरीच्या आईच्या प्रेमात पडला आणि दोघांनी पळ काढल्याची घटना कासगंज परिसरात घडली आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरदेवाचे वडीलच त्याच्या होणाऱ्या सासूला घेऊन फरार झाल्यामुळे नातेवाईकांना धक्का बसला आहे. दोन महिन्यांपूर्वी गावातील दोन कुटुंबांनी आपल्या मुला-मुलीचं लग्न निश्चित केले होते. विवाहाची चर्चा सुरू […]
अधिक वाचा...धक्कादायक! पुणे शहरात दोन अल्पवयीन मुली एकत्र प्यायल्या दारू अन् पुढे…
पुणे : पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षांच्या मुलीने दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दोन अल्पवयीन मैत्रिणी एकत्र दारु प्यायल्या. पण, त्यानंतर दोघींना उलट्या झाल्या. अत्यवस्थ असलेल्या मुलीने त्यांच्या ओळखीच्या मित्राला फोन करून बोलावल्यानंतर ही घटना उघडकीस आली […]
अधिक वाचा...मैत्रिणीच्या छळाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोट समोर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीच्या छळाला कंटाळून एका व्यावसायिकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोजकुमार सोनी (रा. लखीमपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त केली आहे. मृत मनोजकुमार यांचे लखीमपूर येथे दुकान होते. तर त्यांची सीतापूर येथील रहिवासी असलेल्या एका मुलीशी ओळख झाली होती. या मुलीने […]
अधिक वाचा...मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात पाच भाविकांचा मृत्यू तर अनेक जखमी…
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे भाविकांच्या बसला मध्य रात्री एकच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात 49 जण जखमी झाले असून, जखमी भाविकांपैकी सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
अधिक वाचा...IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…
पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय दिवसेंदिवस खोलात जाताना दिसत आहे. पूजा खेडकर यांनी खाजगी गाडीवर लावलेला लाल दिवा आणि त्यानंतर आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल हातात घेत, शेतकऱ्यांवर केलेली दादागिरी यांसह समोर आलेल्या अनेक प्रकरणांमुळे आता पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयाच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे. या प्रकरणाचा अहवाल राज्याच्या पोलिस […]
अधिक वाचा...जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील डोडा परिसरात सोमवारी (ता. १५) रात्री अचानक दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या तुकडीवर हल्ला केला. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत झाली. चकमकीत चार जवान हुतात्मा झाले आहेत. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! जम्मूच्या डोडा जिल्ह्यातील धारी घोट उरारबागी परिसरातील जंगलात सोमवारी रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली. […]
अधिक वाचा...मुंबईत व्हॉट्सऍप चॅटींगवरून युवतीची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या…
मुंबई : मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ममता कदम (वय २३) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून ती अंधेरी येथील रहिवाशी होती. पोलिसांनी मुलीची बॅग आणि मोबाईलची तपासणी केल्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! मरीन ड्राईव्ह […]
अधिक वाचा...सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत दणकेबाज कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत आणखी एक दणकेबाज कारवाई केली आहे. 48 किलो गांजासह सुमारे पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन जणांना जेरबंद केले आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली […]
अधिक वाचा...बिबवेवाडी पोलिस ठाणे हद्दीमध्ये जनजागृती अभियान…
पुणे (संदिप कद्रे): विद्यार्थ्यांनो, व्यसनांपासून दूर राहा रवी खाडे यांचा जनजागृती अभियान बिबवेवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील विद्या निकेतन – प्राथमिक आणि माध्यमिक इंग्रजी माध्यम शाळा, बिबवेवाडी पुणे येथे राबविण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलिस ठाणे हद्दीमध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे अनुषंगाने जनजागृती अभियान राबविण्यात आले. 13/07/2024 रोजी सकाळी 11/45 वा. 12/20 वा. चे दरम्यान मपोशि […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलिस अकादमीत महिला पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्कार…
नाशिक : नाशिकमधील महाराष्ट्र पोलिस अकादमीत महिला पोलिस कर्मचाऱ्यावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीतल्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सुमित याला अटक करण्यात आली आहे. मिळालेली माहितीनुसार, पोलिस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीत कर्मचारी असलेल्या युवकासोबत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे प्रेमसंबंध होते. आरोपीकडून […]
अधिक वाचा...
