प्रेम! नवरदेवाचा बाप पडला नवरीच्या आईच्या प्रेमात अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): नवरदेवाचा बाप नवरीच्या आईच्या प्रेमात पडला आणि दोघांनी पळ काढल्याची घटना कासगंज परिसरात घडली आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवरदेवाचे वडीलच त्याच्या होणाऱ्या सासूला घेऊन फरार झाल्यामुळे नातेवाईकांना धक्का बसला आहे. दोन महिन्यांपूर्वी गावातील दोन कुटुंबांनी आपल्या मुला-मुलीचं लग्न निश्चित केले होते. विवाहाची चर्चा सुरू असताना दोन्ही कुटुंबामध्ये भेटीगाठी होत होत्या. दरम्यान, नवरदेवाचे वडिल आणि नवरीची आई एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमाची माहिती होताच दोघांनी पळ काढला आहे.
मुलीच्या वडिलांनी सांगितले, ‘गावातील ई-रिक्षाचालक शकील नावाच्या व्यक्तीशी त्यांची मैत्री होती. शकील 28 वर्षांपासून त्यांच्या घरी येत जात असायचा. दोन महिन्यांपूर्वी शकीलने आपल्या मुलाचे लग्न याच मित्राच्या मुलीशी करण्याचा प्रस्ताव ठेवला. जो मुलीच्या वडिलांनी मान्य केला. दोघांचे लग्न होणार हे ठरलं होते. नातं निश्चित झाल्यानंतर मुलीची 35 वर्षीय आई आणि मुलाचे वडील यांच्यात बोलणं सुरू झालं. त्यामुळे या लग्नाआधीच दोघंही फरार झाले.’
मुलीचे वडील त्या दोघांच्या शोधात नातेवाईकांकडेही गेले पण सापडले नाहीत. अखेर त्यांनी पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले आणि गुन्हा दाखल केला. दरम्यान, पीडित व्यक्तीने गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.
संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…
प्रेम! पत्नीने घडवून आणली प्रियकर आणि पतीची भेट अन् पुढे…
शाळेत प्रेम! प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीचा हृदयद्रावक शेवट…
हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…
प्रेम! दाजी मेव्हणी सोबत तर तिची आई सासऱ्यासोबत पळाली…
दीर-वहिनीचे प्रेमसंबंध अन् मृत्यूनंतरही चार महिने ‘एक दुजे के लिए’…