बिबवेवाडी पोलिस ठाणे हद्दीमध्ये जनजागृती अभियान…
पुणे (संदिप कद्रे): विद्यार्थ्यांनो, व्यसनांपासून दूर राहा रवी खाडे यांचा जनजागृती अभियान बिबवेवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील विद्या निकेतन – प्राथमिक आणि माध्यमिक इंग्रजी माध्यम शाळा, बिबवेवाडी पुणे येथे राबविण्यात आला आहे.
बिबवेवाडी पोलिस ठाणे हद्दीमध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे अनुषंगाने जनजागृती अभियान राबविण्यात आले. 13/07/2024 रोजी सकाळी 11/45 वा. 12/20 वा. चे दरम्यान मपोशि 3242 गायकवाड सोबत मपोशि 11106 पवार दामिनी बिबवेवाडी असे मिळून बिबवेवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील विद्या निकेतन – प्राथमिक आणि माध्यमिक इंग्रजी माध्यम शाळा, बिबवेवाडी याठिकाणी 75 ते 100 विद्यार्थी व विद्यार्थिंनीं, शिक्षक, स्टाफ उपस्थित होते. एकवेळेस पंगत चुकली तरी चालेल; पण संगत चुकू देऊ नका.’ ‘व्यसनांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. मुले अमली पदार्थांच्या विळख्यात मुले अडकत असल्याने त्यांचे भविष्य उद्धवस्त होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनो व्यसनाधीन व्यक्ती व व्यसनांपासून कायम दूर राहा,’ असा सल्ला मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्थेचे समन्वयक रवी खाडे यांनी दिला.
सदर वेळी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाबाबत व महिला सुरक्षतेबाबत मार्गदर्शन करून व्यसन, व्यसनमुक्ती, व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसनामुळे आपल्या परिवारावर होणारा दुष्परिणाम व व्यसनामुळे वाढती गुन्हेगारी याबाबत योग्य त्या सूचना देनारे मुक्तागण व्यसण केंद्रातील रवि खाडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याबरोबर शाळेतील मुख्याध्यापिका स्नेहा नेवाळकर, सामुपदेशक- सौ. वर्षा पतंगे, शिक्षिका प्रतिभा काटे, सुवर्णा देवधर व मनिषा कांबळेही उपस्थित होत्या. तसेच आपले आजुबासुन संक्षयित इसम अगर वस्तु मिळुन आल्यास त्वरीत बिबवेवाडी पोस्टे येथे संपर्क साधावा असे सांगितले.
IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…
ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा इशारा; थेट लायसन्स होणार रद्द…
बिबवेवाडी पोलिसांनी मोक्यातील टोळी प्रमुख फरार आरोपीस केले जेरबंद…
बिबवेवाडी पोलिसांनी शिरवळ येथे पाठलाग करून चौघांना केली अटक; कारण…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…